नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयसीसी वन-डे विश्वचषक स्पर्धेत तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या खिचडी डाएटचा खुलासा करत वीरेंद्र सेहवागने मुंबईतील आयसीसी रूपरेषा जाहीर करण्याच्या कार्यक्रमात रंगत आणली. धोनीसाठी खिचडी हा आयसीसी विश्वचषक स्पर्धेत लकी चार्म ठरला होता आणि सातत्याने त्याने यावरच भर दिला. योगायोगाने भारताने ही स्पर्धा जिंकल्याने धोनीसाठी देखील हा लकी चार्म विशेष मरत्त्वाचा ठरला. (ODI WC 2011)
सेहवाग याबाबत बोलताना पुढे म्हणाला, 'आम्ही जेथे जेथे गेलो, तेथे तेथे लोक असे म्हणायचे की, यजमान संघ कधीही आयसीसी विश्वचषक स्पर्धा आपल्या देशात जिंकू शकत नाही. प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धा होत्या आणि इकडे धोनी मात्र सातत्याने खिचडी खाण्यात मश्गुल असायचा. जरी आपल्या धावा होत नसतील, झाल्या नाहीत तरी संघ जिंकत राहील, यावर त्याचा ठाम विश्वास होता'. (ODI WC 2011)
आपल्या विश्वचषक प्रवासाबद्दल सांगताना त्याने आपल्याला अनेक चढ-उतारांना सामोरे जावे लागले असल्याचे नमूद केले. '1992 विश्वचषक स्पर्धा पाहिल्यानंतर आपण क्रिकेटप्रेमी झालो. त्यावेळी सचिन तेंडुलकरच्या फलंदाजीचे आपल्याला विशेष आकर्षण निर्माण झाले होते. आठवी इयत्तेत असताना मी विश्वचषक पाहिला आणि विश्वचषक स्पर्धेत सहभागी होण्याचे स्वप्न त्याचक्षणी पाहिले होते. मी तीनवेळा विश्वचषक स्पर्धेत खेळलो. एकदा फायनलमध्ये हरलो. एक फायनल जिंकली आणि एका स्पर्धेत आम्ही दुसर्या फेरीसाठी पात्र ठरू शकलो नाही. 2003 ते 2011 विश्वचषक स्पर्धेदरम्यान मी बरेच चढ-उतार अनुभवले आणि त्याचा हा एक भाग होता', याचा त्याने यावेळी उल्लेख केला.
हेही वाचा;