Latest

NZ vs AFG : न्यूझीलंडचा विजयी चौकार, अफगाणिस्तानवर १४९ धावांनी विजय

Shambhuraj Pachindre

चेन्नई; वृत्तसंस्था : ग्लेन फिलिप्स, टॉम लॅथम व विल यंगच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर न्यूझीलंड संघाने आयसीसी क्रिकेट वन डे विश्वचषक स्पर्धेच्या साखळी सामन्यात अफगाणिस्तानचा 149 धावांचा फडशा पाडला आणि साखळी फेरीत विजयाचा चौकार नोंदवला. (NZ vs AFG)

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर निर्धारित 50 षटकात 6 बाद 288 धावा केल्या तर प्रत्युत्तरात अफगाणिस्तानचा डाव 34.4 षटकात अवघ्या 139 धावांमध्येच खुर्दा झाला. मिशेल सॅन्टनर व लॉकी फर्‍ग्युसन यांनी प्रत्येकी 3 बळी घेत अफगाणच्या डावाला खिंडार पाडले आणि यातून हा संघ शेवटपर्यंत सावरु शकला नाही.

विजयासाठी 289 धावांचे आव्हान असताना अफगाणतर्फे रहमत शाहने सर्वाधिक 36 तर अझमतुल्लाहने 27 धावा केल्या. इतका अपवाद वगळता बहुतांशी अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. किवीज संघातर्फे सॅन्टनरने 39 धावात 3 तर फर्‍ग्युसनने 19 धावात 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. याशिवाय, ट्रेंट बोल्टने 18 धावात 2 व हेन्री, रविंद्र यांनी प्रत्येकी 1 बळी घेतला. या सामन्यात सॅन्टनरने नबीचा एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळा उडवत कारकिर्दीतील 100 वन डे बळींचा टप्पा सर केला. (NZ vs AFG)

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT