Latest

Novak Djokovic : नोव्हाकच्या अडचणीत पुन्हा वाढ; कोरोना पॉझिटिव्ह असताना पत्रकाराला दिली मुलाखत

अमृता चौगुले

बेलग्रेड; पुढारी ऑनलाईन

जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असणारा टेनिसपटू नोवाक जोकोविच ( Novak Djokovic ) याच्या अडचणी कमी होण्याचे नावच घेत नाहीत. दररोज नव्या वादात अडकत चालला आहे. सर्बियामध्ये या गोष्टीची त्याने स्वत:हून कबुली दिली. तसेच यावर तो म्हणाला की, मला त्या पत्रकारास निराश करायचे नव्हते त्यामुळे मी त्याला मुलाखत दिली.

नोवाक जोकोविच (Novak Djokovic) याने डिसेंबरमध्ये एका फ्रेंच वृत्तपत्रास ३३ मिनिटाची मुलाखत दिली. तसेच या वृत्तपत्राच्या माहितीनुसार या मीडिया इवेंटमध्ये त्याने विनामास्क फोटोशूट देखील केले होते. या बेजबाबदार वागणुकीमुळे या सर्बियन खेळाडूवर मोठी टीका केली जात आहे.

तसेच सब्रियाचे पंतप्रधान एना बर्नाबिच यांनी देखील आपण त्याला पाठिंबा देऊ शकत नसल्याचे म्हटले आहे. बर्नाबिच म्हणाल्या, जर कोरोना सक्रमित असल्याचे माहित असून देखिल जर त्याने त्या मीडिया इवेंट मध्ये सहभागी झाला असेल तर त्याने नियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असल्यानंतर त्यांने स्वत:ला आयसोलेशन करुन घ्यायला हवे होते.

या सर्व प्रकारावर नोवाक जोकोविच ( Novak Djokovic ) याने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहून माहिती दिली आहे. त्याने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, या सर्व माहितीने मला व्यथित केले आहे. मी सध्या ऑस्ट्रेलियन ओपनसाठी ऑस्ट्रेलियात असून मी लोकांना अधिक चिंतेच टाकू इच्छित नाही. त्या दरम्यान मी रॅपिड टेस्ट केली होते. तेव्हा मी निगेटिव्ह आलो होतो. त्यानंतरच्या टेस्ट मध्ये मी पॉझिटिव्ह आलो. पण, मी पुरेशी सावधनता बाळगली होती.

यापुढे नोव्हाक ( Novak Djokovic )असे म्हणाला, माझ्या प्रवास कागदपत्रात अनेक चुका झाल्या आहेत. माझ्या सहकारी टिमने त्या माझ्या निदर्शनास आणून दिल्या. माझ्या प्रवासी एजेंटने चुकीच्या जागी टिकमार्क केल्याने हा सगळा गोंधळ झाला आहे. याबाबत मी क्षमा मागतो. माणसांकडून चुका या होत असतात. या सर्व गोष्टी स्पष्ट करण्यासाठी मी ऑस्ट्रेलियाच्या सरकारला मी सर्व माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलियन ओपनसाठी नोव्हाक सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे. पण, त्याच्या स्थलांतर कागदपत्रात अनेक त्रुटी आढळून आल्या. यामध्ये अनेक चुका आढळल्या होत्या. कागदपत्रांमध्ये अशी माहिती दिली गेली होती की, ऑस्ट्रेलियासाठी विमान पकडण्याच्या आधी नोव्हाकने १४ दिवसांपर्यंत कोठेही प्रवास केला नाही. पण, दोन आठवड्यांपूर्वी सर्बिया आणि स्पेनमध्ये त्याला पाहिले गेले होते. यामुळे आता ऑस्ट्रेलियन ओपन मधून बाहेर पडण्याची टांगती तलवार त्याच्या डोक्यावर लटकत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT