Latest

Naveen Patnaik : बीजू जनता दल लोकसभा-विधानसभा स्वबळावर लढणार : नवीन पटनायक

अमृता चौगुले

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : भुवनेश्वर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी गुरुवारी (दि.११) स्पष्ट केले की बीजू जनता दल 2024 (BJD) च्या लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका स्वबळावर लढेल आणि कोणत्याही राजकीय आघाडीत सामील होणार नाही. त्यामुळे भाजपविरोधात विरोधकांची एकजूट करु पाहणाऱ्या नितीश कुमार (Nitish Kumar) आणि ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांसारख्या प्रादेशिक नेत्यांच्या प्रयत्नांपासून त्यांनी स्वतःला दूर केले आहे. (Odisha CM Naveen Patnaik met Prime Minister Narendra Modi in Delhi)

राजधानी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना नवीन पटनायक म्हणाले की, नवीन जे राजकीय समिकरणे किंवा आघाड्या बनत आहेत. त्यांच्यामध्ये आम्ही सामील होत नाही. तिसऱ्या आघाडीत आम्ही आता सहभागी होत नाही, असे त्यांनी माध्यमांना सांगितले. (Naveen Patnaik)

बीजू जनता दल 2024 च्या निवडणुका एकट्याने लढवणार की नाही या प्रश्नावर नवीन म्हणाले, "हे आमचे कायमचे तत्व राहिले आहे." ओडिशाचे मुख्यमंत्री बुधवारपासून दिल्लीत चार दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात त्यांनी कोणत्याही राजकीय नेत्यांला भेटणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Naveen Patnaik)

यावेळी नवीन पटनायक यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबतच्या भेटीबाबत विचारण्यात आले. यावर नवीन म्हणाले की, आमच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाले नाही. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) यांनी मंगळवारी (दि.८ मे) नवीन पटनायक यांची भेट घेतली होती. त्याबाबत नवीना यांना विचारण्यात आल्यावर ते म्हणाले. तो एक राजशिष्टाचाराचा भाग होता. नितीश यांना मला भेटायचे होते आणि आम्ही एकमेकांची भेट घेतली. नितीश कुमार यांना भेटल्यानंतर लगेच नवीन पटानायक यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याने राष्ट्रीय राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.

पंतप्रधानमंत्र्यांच्या भेटीवर नवीन पटनायक म्हणाले की, पंतप्रधानांसोबतच्या भेटीत मुख्य चर्चा पुरी येथील प्रस्तावित श्री जगन्नाथ आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत होती. पंतप्रधानांनी केंद्राकडून शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले, नवीन म्हणाले, प्रस्तावित विमानतळासाठी सीमा आधीच निश्चित केली गेली आहे, जी भुवनेश्वरमधील वाढत्या हवाई वाहतुकीच्या दृष्टीने आवश्यक आहे.


अधिक वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT