Latest

Income Tax Return : इनकम टॅक्स : रिटर्न भरण्यासाठी मुदतवाढ मिळणार का? सरकारचा खुलासा

मोहसीन मुल्ला

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन – २०२१-२२चे इनकम टॅक्स रिटर्न भरण्यसाठीची (Income Tax Return) अंतिम मुदत ही ३१ जुलै आहे. रिटर्न भरण्यासाठी कोणतीही मुदतवाढ देण्याचा विचार सरकारचा नाही, असा खुलासा महसुल सचिव तरुण बजाज यांनी ही माहिती दिली आहे. २० जुलैपर्यंत २.३ कोटी रिटर्न फाईल झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षी ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत ५.८९ कोटी रिटर्न फाईल झाले होते. "नागरिकांचा सर्वसाधरण समज असतो की रिटर्न दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळेल. त्यामुळे सुरुवातीला रिटर्न कमीच फाईल होतोत. अखेरच्या दिवशीपर्यंत." वैयक्तिक करदाते आणि ज्याना ऑडिटची गरज नाही, अशा नागरिकांसाठी इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख ही ३१ जुलै असते.

इनकम टॅक्स विभागाची रिटर्न फाईल करण्यासाठीची नवी वेबसाईट अत्यंत सुटसुटीत आणि मोठी क्षमता असलेली आहे. आतापर्यंत २.३ कोटी नागरिकांनी अगदी सहजपणे, कोणताही अडचण न येता इनकम टॅक्स रिटर्न फाईल केला आहे, असे ते म्हणाले. दररोज जवळपास २० लाख नागरिक रिटर्न फाईल केले जातात, असे ते म्हणाले. गेल्या दोन आर्थिक वर्षांत कोरोनाच्या साथीमुळे इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

हेही वाचलं का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT