Nitish Kumar  
Latest

नितीश कुमारांची शपथविधीनंतर पहिली प्रतिक्रिया, ‘स्‍वगृही परतलो….’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : " मी पूर्वी राष्‍ट्रीय लोकशाही आघाडीमध्‍येच (रालोआ) होतो. आता पुन्‍हा मी तिथेच परतलो आहे. आता कुठेही जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशा शब्‍दांमध्‍ये मुख्‍यमंत्रीपदी शपथ घेतल्‍यानंतर नितीश कुमारांनी आपली भूमिका मांडली.आम्ही बिहारच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करत राहणार, असेही त्‍यांनी यावेळी स्‍पष्‍ट केले. ( Nitish Kumar said that he is 'back to where he was' )

नितीश कुमारांनी आज विक्रमी नवव्यांदा बिहारच्‍या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना ते म्‍हणाले की, आम्ही यापुढे एकत्र राहणार आहोत. आठ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. लवकरच अन्‍य मंत्री शपथ घेतील. बिहारचे माजी उपमुख्‍यमंत्री तेजस्‍वी यादव यांनी नितीश कुमारांचा पक्ष २०२४ मध्‍ये संपुष्‍टात येईल, असे भाकित केले होते. यावर बोलताना ते म्‍हणाले की, "आम्ही बिहारच्या विकासासाठी आणि प्रगतीसाठी काम करत आहोत. यापुढेही आम्ही आमची वाटचाल सुरु ठेवणार आहोत." ( Nitish Kumar said that he is 'back to where he was' )

नितीश कुमार यांनी मुख्‍यमंत्रीपदी शपथ घेतल्‍यानंतर भाजप नेते सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी बिहारच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच जनता दल (संयुक्‍त)चे नेते विजय कुमार चौधरी, बिजेंद्र प्रसाद यादव आणि श्रवण कुमार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर भाजप नेते डॉ प्रेम कुमार, हिंदुस्थानी अवाम मोर्चा (धर्मनिरपेक्ष) अध्यक्ष डॉ संतोष कुमार सुमन आणि अपक्ष आमदार सुमित कुमार सिंह यांनीही कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT