पुढारी ऑनलाइन डेस्क : Nigeria boat capsized : नायजेरियामध्ये सोमवारी पहाटे नायजर नदीत बोट उलटून शेकडो लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. सीएनएनने स्थानिकांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार एएनआयने याची माहिती दिली आहे. या घटनेत जवळपास १०० जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बोटीवर ३०० लोक होते.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे हा अपघात झाला. उत्तर-मध्य क्वारा राज्यातील पातगी जिल्ह्यातील कपाडा येथील पारंपारिक प्रमुख अब्दुल गण लुकपाडा काही अडकलेल्यांनी सांगितले. झाडाच्या खोडाला आदळल्यानंतर ही बोट 300 लोकांना घेऊन उलटली (Nigeria boat capsized) होती, असे CNN ने कपाडा येथील पारंपारिक प्रमुख अब्दुल गण लुकपाडा यांचा हवाला देत वृत्त दिले.
लुकपाडा यांनी सांगितले की, जवळच्या गावात लग्न समारंभ होता आणि समारंभानंतर पाऊस सुरू झाला. मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचल्याने लग्नाच्या पाहुण्यांनी बोटीने जाण्याचा निर्णय घेतला. एग्बोटी हे गाव नायजर नदी काठी वसलेले आहे. पावसानंतर इथे परिस्थिती भीषण असते. मोटारसायकलचा वापर करता न आल्याने एग्बोटीच्या बाहेर जाण्यासाठी बोट वापरण्याचा निर्णय घेतला.
स्थानिक अब्दुल गण लुकपाडा यांनी सांगितले की, बोटीमध्ये 300 लोक होते, ज्यामध्ये विविध समुदायातील पुरुष आणि महिलांचा समावेश होता. ते पुढे म्हणाले, "सोमवारी पहाटे 3:00 ते 4:00 च्या दरम्यान बोट पाण्यात लपलेल्या झाडाच्या फांदीला धडकली आणि तिचे दोन तुकडे झाले. पाण्याचे प्रमाण जास्त होते, त्यामुळे ती वाहून गेली. प्रवासी दूर आहेत. मला माहिती मिळाली आहे की फक्त 53 जण बचावले आहेत. बाकीच्यांचा मृत्यू होण्याची भीती आहे."
सीएनएनशी बोलताना, क्वारा येथील पोलीस कमांडचे प्रवक्ते अजय ओकासान्मी म्हणाले की, काय घडले याचे ऑन-द-स्पॉट मूल्यांकन करण्यासाठी प्रदेशात एक टीम तैनात करण्यात आली आहे." घटनेची माहिती ४ ते ५ तासानंतर मिळाली. माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले. मात्र, किमान १०० जणांच्या मृत्यूची भीती आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, नायजेरियातील अनेक दुर्गम समुदायांमध्ये बोटीचे अपघात सामान्य आहेत. येथे वाहतुकीसाठी सहसा स्थानिक बोटींचाच वापर केला जातो.याआधी मे महिन्यात नायजेरियातील सोकोटो येथे बोट उलटून 15 जणांचा मृत्यू झाला होता.
हे ही वाचा :