Latest

New Mahindra Thar : नव्या वर्षात धमाल माजवणार नवी महिंद्रा थार

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२२ मध्ये महिंद्रा कंपनीच्या गाड्या सगळ्यात जास्त चर्चेत राहिल्या. Scorpio N, XUV7OO, Thar, XUV3OO, Bolero आणि Bolero Neo अशी या काही शक्तिशाली वाहने आहेत. सर्वच वर्गातील लोकांमध्ये थारची प्रचंड क्रेझ होती. कंपनी 2023 मध्ये थारचे नवे मॉडेल लाँच करण्यात येणार आहे. त्यामुळे महिंद्राच्या या लोकप्रिय कारच्या नव्या व्हर्जनसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार नाही.

जाणून घ्या कसे असेल इजिन

नवीन महिंद्रा थार ही 1.5 लीटर डिझेल इंजिनसह सुसज्ज असेल. याचे इंजिन 117 Bhp ची कमाल पॉवर आणि 300 Nm चा पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. नवीन थारमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन असण्याची शक्यता आहे. 2.0-लिटर mStallion 150 टर्बो-पेट्रोल (150bhp कमाल पॉवर आणि 320Nm पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम) आणि 2.2-लीटर mHawk 130 डिझेल (130bhp आणि 30mk व्हेरिअंट पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम) या दोन पर्यायांमध्ये ही कार उपलब्ध होण्याची शक्यता आहे. दोन्ही इंजिनमध्ये 6-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक टॉर्क कन्व्हर्टर पर्याय आहेत.

जाणून घ्या नव्या थारची किंमत आणि फिचर्स

सध्या महिंद्रा थार 4WD सिस्टीमच्या स्टँडर्ड पर्यायामध्ये उपलब्ध असेल. नव्या कारची सुरुवातीची किंमत 13.59 लाख रुपयांपासून सुरू होते आणि टॉपचे मॉडेलची किंमत 16.29 लाख रुपयांपर्यंत (एक्स-शोरूम) असेल.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT