पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता पियुष मिश्रा ( Piyush Mishra ) हा एक उत्तम अभिनेता तर आहेच त्याचबरोबर एक चांगला गायक देखील आहे. त्यांना गाण्याची खूप आवड आहे. एक बगल में चांद होगा किंवा आनंद हैं प्रचंड यांसारख्या गाण्यांमध्ये विशेष उत्कटता दिसून येते. तसेच जहांगीर नेहरू युनिव्हर्सिटी (JNU) या त्यांच्या आगामी चित्रपटातील 'मैं नहीं मानता' हे नवीन गाणे रिलीज करण्यात आले आहे. पियुष मिश्रा या गाण्यात एका नव्या स्टाईलमध्ये दिसणार आहेत. त्यांच्या 'मैं नही मानता' या गाण्यात बरच काही दडलेले आहे. हे गाणे रिलीज होताच इंटरनेटवर खूप पसंत केले जात आहे.
संबंधित बातम्या
हे गाणे दानिश राणा यांनी लिहिले असून विजय वर्मा यांनी संगीत दिले आहे. 'बुड्ढे बाबा की आँखों में आसूं देखे' या लिरिक्सने गाण्याची सुरुवात होत आहे. हे गाणे म्हणजे एक प्रकारचा व्यंग आहे. हे गाणे सामाजिक आणि राजकीय वास्तविकतेवर स्पष्ट भावनिक भाष्य करत आहे. पियुष मिश्राच्या मखमली आवाजामुळे गाण्याचे भाव आणि उद्दिष्टे प्रभावीपणे समोर येत आहे. या गाण्यासाठी निर्मात्या प्रतिमा दत्ताने पियुष मिश्राची निवड केली.
याविषयी बोलताना चित्रपटाच्या निर्मात्या प्रतिमा दत्ता यांनी सांगितले की, अभिनेता पियुष मिश्राना अभिनयासाठी नाही तर हे गाणे गाण्यासाठी मनवने थोडे कठीण होते. पण चित्रपटाची थीम खूप ज्वलंत आहे. या गाण्यासोबत पियुष मिश्राव्यतिरिक्त कुणी दुसरं न्याय करू शकत नव्हतं. हे गाणे आल्यावर प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता माझा निर्णय योग्य होता याची खात्री पटली आहे.
महाकाल मुव्हीज प्रायव्हेट लिमिटेडच्या बॅनरखाली निर्मित, जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी (जेएनयू) प्रतिमा दत्ता निर्मित आणि विनय शर्मा दिग्दर्शित या चित्रपटात उर्वशी रौतेला, पियुष मिश्रा ( Piyush Mishra ) , रवी किशन, सिद्धार्थ बोडके, विजय राज, रश्मी देसाई, अतुल पांडे, सोनाली सेगल सारखे प्रतिभावान कलाकार आहेत. हा चित्रपट ५ एप्रिल २०२४ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.