Latest

सूर्यकुमार यादवपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही : पाँटिंग

अविनाश सुतार

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : टीम इंडियाचा स्टार आणि स्फोटक खेळाडू सूर्यकुमार यादव सतत चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या शॉट मारण्याच्या प्रतिभेने सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. सूर्यकुमार यादवला 'मिस्टर ३६०' असे म्हटले जाते. तो चारही दिशेला फटकेबाजी करतो. त्याला आयसीसीकडून २०२२ चा टी-२० 'प्लेयर ऑफ द इयर' पुरस्कारदेखील मिळाला आहे. आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू रिकी पाँटिंगने त्याचे कौतुक केले आहे. सूर्यकुमार यादवपेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही, अशा शब्दांत त्याने सूर्याचे कौतुक केले आहे.

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आयसीसीच्या रिव्ह्यूत सूर्यकुमार यादवबद्दल अनेक मोठ्या गोष्टी सांगितल्या. या शोमध्ये तो म्हणाला की, आम्ही अनेक खेळाडूंना ३६० डिग्री शॉटस् मारताना पाहिले आहे, पण सूर्याचे काही शॉट खूपच उत्कृष्ट आहेत. तो ज्या पद्धतीने यष्टिरक्षकाच्या मागे चेंडू लगावतो ते उत्कृष्ट आहे. तो अनेक लोकांपेक्षा चांगल्या पद्धतीने लगावतो. दुसरीकडे पाँटिंग म्हणाला की, इनोव्हेशन आणि स्किलनुसार या फॉरमॅटमध्ये मी त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही. तो जे करतो आहे, ते करण्याचा प्रयत्न आणखी खेळाडू करतील आणि हे फॉरमॅट पुढे जाईल. रिकी पाँटिंगनेही सूर्यकुमार यादवच्या फिटनेसबद्दल सांगितले.

हे वचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT