Latest

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार यांनी दिला भाजप सदस्यत्वाचा राजीनामा

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस (ChandraKumar Bose)  यांनी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. विवेकबुद्धीने पक्षात राहणे अशक्य असल्याचे त्‍यांनी म्‍हटले आहे.

ChandraKumar Bose : विवेकबुद्धीने पुढे जाणे अशक्य

चंद्रकुमार बोस यांनी म्‍हटलं आहे की, आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सुभाषचंद्र बोस आणि सरतचंद्र बोस यांच्‍या विचारसणीचा प्रचार करण्‍यासाठी भाजपच्‍या केंद्र किंवा राज्‍या पातळीवरुन पाठिंबा मिळाला नाही. मी लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी बंगालची रणनीती सुचवणारा प्रस्ताव मांडला होता;पण माझ्‍या प्रस्तावांकडे दुर्लक्ष करण्यात आले. या दुर्दैवी परिस्थितीमुळे मला भाजपचा सदस्य म्हणून सर्व विवेकबुद्धीने पुढे जाणे अशक्य झाले आहे,"

"नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे थोरले बंधू, माझे आजोबा सरतचंद्र बोस यांच्या 134 व्या जयंतीदिनी बोस कुटुंबासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्याचे निवडले आहे,", असेही त्‍यांनी म्‍हटले आहे. राजीनाम्यानंतर त्‍यांनी इंडिया विरुद्ध भारत वादावर भाष्य केले. ते म्हणाले की, भारतीय राज्‍य घटनेत स्पष्टपणे नमूद केल्याप्रमाणे इंडिया भारत आहे म्हणून हा मुद्दाच गैर आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT