Latest

Neck pain : मानदुखीमुळे त्रस्‍त आहात? ‘हे’ उपाय देतील आराम

Arun Patil

कामाचे तास वाढल्याने नोकरदार मंडळींना बराच वेळ बसून काम करावे लागते. अशा स्थितीत मानेची अवस्था वाईट होते. अपुर्‍या झोपेमुळेदेखील मानेला आराम मिळत नाही. परिणामी, डोकेदुखी, खांदेदुखी, हातदुखीसारखे आजार होतात. वेदनाशामक औषधी घेतल्यानंतर आपल्याला तात्पुरता आराम मिळतो. परंतु, चुकीच्या सवयीमुळे मानेचा त्रास कमी न होता तो वाढतच जातो.मान आखडणे किंवा दुखणे हा आजार सामान्य असला तरी तो त्रासदायक आहे. झोपेच्या चुकीच्या पद्धती, ताठ न बसणे किंवा अवघडलेल्या अवस्थेत बसल्यामुळे मान आखडू शकते. चुकीच्या पद्धतीने झोपल्यामुळे मानेच्या शिरा अवघडतात आणि आजाराला निमंत्रण मिळते.

आजकाल कामाचे तास वाढल्याने नोकरदार मंडळींना बराच वेळ बसून काम करावे लागते. अशा स्थितीत मानेची अवस्था वाईट होते. अपुर्‍या झोपेमुळे देखील मानेला आराम मिळत नाही. परिणामी, डोकेदुखी, खांदेदुखी, हातदुखीसारखे आजार होतात. वेदनाशामक औषधी घेतल्यानंतर आपल्याला तात्पुरता आराम मिळतो. परंतु, चुकीच्या सवयीमुळे मानेचा त्रास कमी न होता तो वाढतच जातो. तसेच वारंवार वाहन चालविण्यामुळेदेखील मानेला वेदना होतात. रस्त्यातील खड्डे, खराब वाहन चालवणे आदींमुळेदेखील मानेला त्रास होतो. कधी कधी मानेला झटका बसूनही आपल्या त्रासात भर पडू शकते. त्यामुळे वाहन नेहमी सावकाश चालवावे जेणेकरून मानेला धक्का बसणार नाही. त्याचबरोबर काही व्यायामाची पथ्ये पाळली, तर आपल्याला आराम मिळू शकतो.

Neck pain : खालील व्‍यायाम प्रकार देतील आराम 

आखडलेल्या किंवा अवघडलेल्या मानेला आराम मिळण्यासाठी काही व्यायाम करणे गरजेचे आहे. हे व्यायाम नियमित केल्यास मानेच्या त्रासापासून काही प्रमाणात मुक्ती मिळू शकते. सकाळी उठल्याबरोबर कामाला जाण्यापूर्वी व्यायाम करणे हे दिवसाची चांगली सुरुवात ठरू शकते.

ताठ बसून शरीराला हळूहळू सैल सोडा. मान सरळ ठेवून ती नंतर डावीकडून उजवीकडे आकाशाकडे पाहत हळूच फिरवा. मानेवर ताण पडणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. काही मिनिटांपुरतीच केलेला व्यायाम हा स्नायू मोकळे करण्यासाठी पूरक ठरतो.

मानेच्या व्यायामानंतर खांद्याचा व्यायाम करावा. दोन्ही हात मोकळे सोडून एकाचवेळी खांद्याच्या बरोबरीने हात आणावे आणि ते पुन्हा वर-खाली करावे. खांदे आणि हाताच्या व्यायामामुळे स्नायू सैल होऊन ताण कमी होतो. तसेच खांद्यावर दोन्ही हात ठेवून ते हात काही मिनिटे फिरवा.अशा प्रकारे लहान व्यायाम करून आपण मानेतील त्रास कमी करून घेऊ शकतो.

Neck pain : व्यायामानंतर काही वेळ बर्फाचा वापर केल्यास त्रास कमी होतो

आणखी आरामासाठी थंड पाणी किंवा बर्फाचा वापर करू शकतो. ज्या भागात वेदना होत आहेत, त्या ठिकाणी हलक्या हाताने बर्फ फिरवल्यास किंवा थंड पाण्याची पिशवी फिरवल्यास स्नायू मोकळे होऊ शकतो. त्यामुळे व्यायामानंतर काही वेळ बर्फाचा वापर केल्यास मानेचा त्रास कमी होतो.

गरम पाण्याने शेकल्यामुळे रक्तपुरवठा सुरळीत होण्यास हातभार लागतो. दहा ते पंधरा मिनिटे गरम पाण्यांची मानेला उब दिल्यास निश्चितपणे आराम पडतो. गरम वाफही मानेवर घेतली, तर वेदना कमी होण्याचा अनुभव अनेकांना आला आहे. या तंत्राचाही आपण वापर करू शकतो. आपली मान म्हणजे स्प्रिंग नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. मानेला हवे तसे वाकवू नये. अन्यथा गंभीर आजारालाही सामोरे जावे लागू शकते. त्याचप्रमाणे तेल मालीश करूनही मानेच्या वेदना कमी करता येऊ शकतात. चांगल्या दर्जाचे वेदनाशमक तेल मानेवर हलक्या हाताने फिरवले, तर वेदना कमी होऊ शकतात. तेल लावल्याने चांगला आराम पडू शकतो.

डॉ. भारत लुणावत

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT