पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथची लेडी सुपरस्टार नयनतारा (Nayanthara) ने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटर कही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचा पती विग्नेश शिवनसोबत रोमँटिक अंदाजात दिसतेय. विग्नेशला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत रोमँटिक फोटो पोस्ट केले आहेत. फोटोत दोघांमधील जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. (Nayanthara)
हे फोटो शेअर करताना नयनताराने लिहिले की, 'हॅप्पी बर्थडे. सांगायला आणि लिहायला खूप काही आहे. जर मी सुरू केलं तर मला वाटत नाही की मी थांबेन. प्रेमाच्या रूपात तुम्ही मला मिळाल, माझं सौभाग्य आहे. तुझ्यासारखे कोणीच नाही. माझ्या आयुष्यात येण्यासाठी धन्यवाद. तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम आहात. मी मनाने प्रार्थना करते की, तुम्हाला आयुष्यात सर्वकाही मिळो. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण होवो. तुम्ही नेहमी आनंदी राहा. आय लव्ह यू.'
यानंतर नेटकऱ्यांनी यावर कॉमेंट्स करणे सुरु केले. फोटोमध्ये दोघेही व्हाईट आऊटफिटमध्ये दिसत आहेत. फोटोजमध्ये तुम्ही पाहू शकता की, ती विग्नेशला कधी Kiss तर कधी रोमँटिक पोझमध्ये दिसतेय.
नयनताराने मागील वर्षी विग्नेश शिवनसोबत लग्न केले होते. या कपलने ९ जून, २०२२ रोजी रीतीरिवाजानुसार लग्न केले होते. कपलच्या माहितीनुसार, दोघांनी ६ वर्षांपूर्वी विवाह रजिस्टर केले होते. या गोष्टीचा खुलासा तेव्हा झाला, जेव्हा मागील वर्षी लग्नानंतर ३ महिन्यांनी सरोगेसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई झाली होती.