पुढारी ऑनलाईन डेस्क
सध्या मुंबई येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी (दि. २३) पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे विधानभवन परिसरात येताच विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनाला बसलेले आमदार नितेश राणे यांनी 'म्याव म्याव' असा आवाज काढून आदित्य ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न केला होता. (nawab malik tweet)
त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले होते की, कधीकाळी शिवसेना वाघाप्रमाणे डरकाळ्या फोडत होती. मात्र हल्ली सेनेची अवस्था मांजरासारखी झाली आहे. म्हणूनच आपण आदित्य ठाकरेंना बघून म्याव म्याव असा आवाज काढला होता. (nawab malik tweet)
नितेश राणेंच्या म्याव म्याव प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेतेही नितेश राणेंच्या 'म्याव म्याव' प्रकरणाचा समाचार घेत आहेत. आज (दि. २४) अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एक मीम ट्विट करून राणेंवर 'पहचान कौन' असे म्हणत अप्रत्यक्ष टीका केल्याची चर्चा आहे. या मीममध्ये कोंबडीच्या धडावर मांजराचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे.
हेही वाचा