असदुद्दीन ओवेसी , नवनीत राणा  ( संग्रहित छायाचित्र ) 
Latest

Navneet Rana : ‘प्रत्येक रस्त्यावर रामभक्त..’ : नवनीत राणांचे ओवेसींना पुन्‍हा आव्‍हान

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : असदुद्दीन ओवेसी म्‍हणतात त्‍यांचा भाऊ 'तोफ' आहे. त्‍यांनी आपल्‍या भावाला स्‍वत:च्‍या नियंत्रणात ठेवले आहे ते चांगले आहे. नाहीतर प्रत्‍येक ररस्‍त्‍यावर रामभक्‍त आणि पंतप्रधान मोदीजींचे सिंह फिरत आहेत. मी लवकरच हैदराबादला येणार आहे, अशा शब्‍दांमध्‍ये भाजप नेत्‍या नवनीत राणा यांनी असदुद्दीन ओवेसी यांना आव्‍हान दिले.

काय म्‍हणाल्‍या नवनीत राणा ?

  • मी एका सैनिकाची मुलगी आहे.
  • रामभक्त आणि मोदीजींचे सिंह गल्लीबोळात फिरत आहेत
  • मी लवकरच हैदराबादला येत आहे.

आम्ही बाहेर तोफगोळे सजावटीसाठी ठेवतो

असदुद्दीन ओवेसी यांनी मोगलपुरा येथील प्रचार सभेत आपला धाकटा भाऊ अकबरुद्दीन ओवेसी हा तोफेप्रमाणे असल्याचे म्‍हटले होते. याला प्रत्‍युत्तर देताना नवनीत राणा म्‍हणाल्‍या की, "राम भक्त" प्रत्येक रस्त्यावर फिरत आहेत. ओवेसी यांच्‍यासारख्‍या लोकांनी अशा "तोफ" त्यांच्या घराबाहेर सजावटीसाठी ठेवल्या आहेत. मी एका सैनिकाची मुलगी आहे. "आम्ही बाहेर तोफगोळे सजावटीसाठी ठेवतो. ओवेसी म्हणतात की, 'त्यांनी आपल्या भावाला ताब्यात ठेवले आहे.' हे चांगले आहे, नाहीतर रामभक्त आणि मोदीजींचे सिंह गल्लीबोळात फिरत आहेत. मी लवकरच हैदराबादला येत आहे.

काय म्‍हणाले होते असदुद्दीन ओवेसी?

असदुद्दीन ओवेसी हे मोगलपुरा येथे एका सभेत बोलताना म्‍हणाले होते की, माझा धाकटा भाऊ अकबरुद्दीन तोफेसारखा होता. मी खूप प्रयत्नांनंतर त्‍याला रोखले आहे. तो एक धर्मगुरू आहे. सालारचा मुलगा. तुम्हाला काय हवे आहे?

राणा- ओवेसी यांचे एकमेकांना आव्‍हान-प्रतिआव्‍हान

यापूर्वी भाजप नेते एआयएमआयएम आमदार अकबरुद्दीन ओवेसी यांच्या 2013 च्या वादग्रस्त भाषणाला उत्तर देत नवनीत राणा म्‍हणाल्‍या होत्‍या की, पोलिसांना हटवले गेले तर देशातील "हिंदू-मुस्लिम गुणोत्तर" संतुलित करण्यासाठी त्यांना फक्त १५ मिनिटे लागतील. लहान भाऊ म्हणतो १५ मिनिटांसाठी पोलिसांना काढून टाका; मग आम्ही त्यांना दाखवू की, आम्ही काय करू शकतो. मला त्यांना सांगायचे आहे की, तुम्‍हाला १५ मिनिटे लागणार असातील तर आम्‍ही 15 सेकंदांसाठी पोलिसांना हटवले तर दोन्ही भावांना ते कुठून आले आणि कुठे गेले हे समजणार नाही, असे आव्‍हान राणा यांनी दिले होते. राणाच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना "15 सेकंद" ऐवजी एक तास देण्यास सांगितले आणि ते भाजप नेत्याला घाबरत नाहीत असे म्‍हटलं होते. नवनीत राणा यांनी "काँग्रेसला मत म्हणजे पाकिस्तानला मत" अशी कथित टिप्पणी केली. तेलंगणा पोलिसांनी या प्रकरणी गुन्‍हा दाखल केला आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT