पुढारी ऑनलाईन डेस्क : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून आज (दि. २१) जात पडताळणी प्रकरणी दिलासा देण्यास नकार देण्यात आला . या निर्णयामुळे खासदार नवनीत राणा यांच्या खासदारकीविषयीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या प्रकरणी नवनीत राणा आणि त्यांचे वडील यांनी त्यांच्या विरोधात मुलुंड पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यातून दोषमुक्ती करण्यात यावी, याकरिता मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. यावर आज सुनावणी झाली. न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळून लावली आहे.
नवनीत राणा यांचा रवी राणा यांच्याशी २०१३ मध्ये विवाह झाला. विवाहानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले. त्याची पडताळणी देखील करण्यात आली होती. मात्र या प्रमाणपत्राविरोधात शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी २०१७ मध्ये याचिका दाखल केली. या याचिकेमुळे न्यायालयाने जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणी करण्याचा निर्णय दिला होता. दरम्यानच्या काळात नवनीत राणा यांनी या जात प्रमाणपत्राच्या आधारे २०१९ ची लोकसभा निवडणूक लढवली. या निवडणूकीत राणा विजय मिळवत शिवसेनेचे अडसूळ यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली. हेच प्रमाणपत्र रद्द करण्यात आल्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने 8 जून 2021 रोजी दिला होता.
हेही वाचा :