Latest

नवनीत राणा जरा तोंड सांभाळून! कोण आहात आपण ? : शिवसेना प्रवक्त्या संजना घाडींचा हल्लाबोल

Shambhuraj Pachindre

मुंबई पुढारी वृत्तसेवा : मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंचा सर्वनाश होणार, असे वक्तव्य करून स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवनीत राणांचा शिवसेना प्रवक्त्या संजना घाडी यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

संजना घाडी म्हणाल्या की, कोण आहात आपण 'सी' ग्रेड फिल्म मध्ये काम करणाऱ्या एक अभिनेत्री. एका आमदाराबरोबर आपला विवाह केल्यामुळे  राजकारणात आपला चंचू प्रवेश झाला. काय संबंध आपला हनुमान चालीसाशी? हनुमानाला हनुमान का म्हणतात, याचं साधं उत्तर मुलाखतीमध्ये आपल्याला देता आलं नाही. भाजपाच्या सी डी टीम म्हणून काम करणाऱ्या मनसेने भोंग्यांच्या विषयासाठी मशिदीसमोर हनुमान चालीसा वाचा म्हणून सांगितलं तर तुम्ही डायरेक्ट मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचायला निघालात. ज्यांना लाखो शिवसेनिकांचे श्रद्धास्थान असलेलं मातोश्री या मंदिरातला आणि मशिदीतला फरक कळत नाही त्यांना आणखी कशी वागणूक मिळायला पाहिजे होती.

तुम्ही म्हणाला शिवसेनेने काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर आघाडी केली वगैरे वगैरे. म्हणून मातोश्री आणि मातोश्री चे विचार हिंदुत्ववादी राहिले नाहीत. बाळासाहेबांचे राहिले नाहीत; पण याच मातोश्रीवर माननीय बाळासाहेबांनी मुस्लिम कुटुंबीयांना त्यांची नमाजाची वेळ झाल्यानंतर नमाज अदा करण्याची विनंती केली होती आणि त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत नमाज अदा केला देखील. हे तुमच्यासारख्या "मुंबईची मुलगी' म्हणून घेणाऱ्यांना माहिती पाहिजे. ही मुंबईची मुलगी कदाचित त्यावेळी" C" ग्रेड फिल्म करण्यात बिझी होती. आणि आता फड उभा करून कमळाबाईची सुपारी वाजवते. हे महाराष्ट्र आणि मुंबईला पक्के कळाले आहे, असा टोलाही घाडी यांनी लगावला.

कावळीणीच्या शापाने गाय मरत नाही. त्यामुळे माझ्यावर झालेल्या अन्यायाने शिवसेनेला कार्यकर्ता उरला नाही अशी वक्तव्ये करू नका. शिवसेना कालही मजबूत होती आजही मजबूत आहे आणि तुमच्यासारख्या 100 दुश्मनांच्या छाताडावर उभी राहून पुन्हा एकदा या मुंबई महाराष्ट्रावर आपला भगवा डौलाने फडकत ठेवणार आहे, असा विश्वासही संजना घाडी यांनी व्यक्त केला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT