Latest

Naveen Ul Haq vs Kohli: नवीन-उल-हकने पुन्हा घेतला कोहलीशी पंगा, नाव न घेता साधला निशाणा

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : Naveen Ul Haq vs Kohli : आयपीएलमध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यातील सामन्यात विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. लाइव्ह मॅचदरम्यान मैदानावर दोघेही एकमेकांना भिडले होते. सामना होऊन आठवडा उलटून गेला तरी दोघेही सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत.

नवीन-उल-हकने शनिवारी इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्याने कोणाचेही नाव न घेता टोला लगावण्यासारखे विधान केले आहे. नवीन-उल-हकच्या या पोस्टवर गौतम गंभीरनेही प्रतिक्रिया दिली आहे.

नवीनने म्हटलं की, 'लोकांशी जसे वागावे तसे वागवा. लोकांनी तुमच्याशी जसे बोलावे तसे तुम्ही त्यांच्याशी बोला. यासोबतच त्याने ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम (G.O.A.T)चा एक इमोजी देखील तयार केला आहे. म्हणजेच तो गंभीरला सर्वकालीन महान असे म्हणत आहे. यावर कमेंट करताना गंभीरने लिहिले, 'तुम्ही जसे आहात तसे व्हा!! 'कधीच बदलू नकोस.' (Naveen Ul Haq vs Kohli)

नवीनची ही पोस्ट विराट कोहलीवर नाव न घेता निशाणा साधण्याचा प्रयत्न असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्या पोस्टवर गंभीरनेही कमेंट केली आहे. 1 मे रोजी झालेल्या त्या सामन्यात नवीन सोबत विराट कोहली गौतम गंभीरशीही भिडला होत. यानंतर तिन्ही खेळाडूंवर कारवाई करण्यात आली. विराट आणि गंभीरला मॅच फी च्या 100 टक्के आणि नवीनला 50 टक्के दंड ठोठावण्यात आला होता. (Naveen Ul Haq vs Kohli)

लखनौविरुद्धच्या सामन्याच्या एका दिवसानंतर कोहलीने एक पोस्ट टाकली होती, ज्यामध्ये लिहिले होते की, 'जे काही आपण ऐकतो ते तथ्य नसून मत आहे. आपण जे काही पाहतो ते सत्य नसून वृत्ती असते.' यानंतर नवीनने इंस्टाग्राम स्टोरी देखील अपडेट केली आणि प्रत्युत्तर देत म्हटले की, 'तुम्हाला तेच मिळते ज्याची हक्कदार असता. असेच झाले पाहिजे आणि तेच होते.'

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT