हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य ओरीपाला अटक  File Photo
राष्ट्रीय

हाथरस चेंगराचेंगरी प्रकरणी मुख्य ओरीपाला अटक

आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत १३३ भाविकांचा मृत्‍यू झाला. याप्रकरणी मुख्य आरोपी  देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी (दि.५) रात्री उशिरा दिल्लीतील उत्तम नगर येथून अटक करण्यात आली. देव प्रकाश मधुकर हा मंगळवारी (दि.२) हातरस येथे झालेल्या भीषण अपघातानंतर फरार झाले होते. Hathras stampede news

काय आहे प्रकरण 

  • उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमात चेंगराचेंगरी

  • आतापर्यंत १३३ भाविक मृत्यू

  • मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकरला अटक 

मुख्य आरोपीला अटक; आज न्यायालयात हजर करणार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात नारायण साकार विश्व हरी या नावाने प्रसिद्ध असलेल्या भोले बाबाच्या सत्‍संग कार्यक्रमानंतर झालेल्‍या चेंगराचेंगरीत आतापर्यंत १३३ भाविकांचा मृत्‍यू झाला आहे. ही घटना मंगळवारी (दि.२) रोजी घडली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याला शुक्रवारी (दि.५) रात्री उशिरा दिल्लीतील उत्तम नगर येथून अटक करण्यात आली. देव प्रकाश मधुकर हा मंगळवारी (दि.२) हातरस येथे झालेल्या भीषण अपघातानंतर फरार झाले होता. देव प्रकाश मधुकर हा भोले बाबांच्या जवळचे असल्याचे सांगितले जाते. Hathras stampede

मिळालेल्या माहितीनुसार, दोन जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात ७८ जणांचा सहभाग होता. अटक केलेला मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याच्याविरुद्ध भारतीय न्यायिक संहितेच्या कलम १०५, ११०, १२६, २२३, २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक लाख रुपयांचे बक्षीस

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी देव प्रकाश मधुकर याने मुद्दाम लोकेशन ट्रेस करून स्वतःला अटक केली आहे. यूपीचे हाथरस पोलीस दिल्लीच्या उत्तम नगरमध्ये पोहोचले होते. तेथून देव प्रकाशला अटक करून यूपीला नेण्यात आले. अटकेनंतर पोलिसांनी देव प्रकाश मधुकर याची चौकशी सुरू केली आहे. हातरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीनंतर झालेल्या अपघातापासून मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर याचा शोध सुरू होता. त्याच्यावर पोलिसांनी एक लाख रुपयांचे बक्षीसही ठेवले होते.

कोण आहे देव प्रकाश मधुकर?

हाथरस प्रकरणातील मुख्य आरोपी देव प्रकाश मधुकर हा हाथरस येथील रहिवासी आहे. सिकंदरमाळ कोतवाली परिसरातील मोहल्ला दमदमपुरा येथील न्यू कॉलनीत त्याचे घर आहे. दोन जुलै रोजी हाथरस येथे चेंगराचेंगरी घटना झाल्यानंतर देव प्रकाश मधुकर संपूर्ण कुटुंबासह फरार झाला होता. देव प्रकाश मधुकर ज्या सत्संगात हा अपघात झाला त्याचा मुख्य संयोजक होता.

देव प्रकाश मधुकर सिकंदरराव यांच्याकडे येताच भोले बाबांच्या मानव मंगल मिलन सद्भावना समागम समितीमध्ये सामील झाले. हळूहळू सत्संगाच्या आयोजनाबाबतची त्यांची काम करण्याची वृत्ती पाहून देव प्रकाश यांच्याकडे मुख्य सेवेदाराची जबाबदारी आली. देवप्रकाश यांनी उपजिल्हा दंडाधिकारी सिकंदरराव यांच्याकडून फुलराई मुघलगढी येथे झालेल्या सत्संगासाठी परवानगीही घेतली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवप्रकाशची पत्नी रंजना हिला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मधुकरचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT