नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केला आहे.काँग्रेसचे नेते तसे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बुधवारी महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, त्याचे खापर भाजपवर फोडले. गेहलोत म्हणाले, महाराष्ट्रातील आघाडी सरकारविरोधात भाजपचे कटकारस्थान जुनेच आहे, त्याचा प्रत्यय तेवढा आता आलेला आहे. आधी मध्य प्रदेशमध्ये हा खेळ भाजपने केला. नंतर राजस्थानमध्ये तसा प्रयत्न करून पाहिला. आता महाराष्ट्रावर भाजपचे हे संकट ओढविले आहे.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार चालला. आता आमदारांची खरेदी सुरू झाली आहे. देश संविधानाबरहुकूम चालला पाहिजे. हिंदुत्वाच्या नावाखाली लोकशाही कमकुवत होत चाललेली आहे. लोकांना आता कळत नाहीये; पण नंतर पश्चात्तापाची वेळ येईल,
असेही गेहलोत म्हणाले.