अमृतसर ; पुढारी ऑनलाईन अमृतसर पंजाब च्या अजनाला मध्ये खालिस्तान समर्थक अमृतपाल सिंह व्दारे पोलिस स्टेशनवर हल्ल्याच्या प्रकरणावर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आपली प्रतिक्रिया दिली. मान यांनी म्हटलंय की, एक हजार लोकांना पूर्ण पंजाब मानता येणार नाही. हे काही लोक आहेत, ज्यांना परदेशातून, पाकिस्तानमधून फंडिंग होते. या लोकांना पंजाबला अशांत करायचा आहे.
खरे तर, खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह आणि त्यांच्या समर्थकांनी अमृतसरच्या अजनाला मध्ये गुरूवारी पोलिस स्टेशनवर हल्ला चढवला. अमृतपालने त्याचा साथीदार लवप्रीत सिंह तूफानला सोडवण्यासाठी हिंसक आंदोलन केले होते. यामध्ये अनेक पोलिस कर्मचारी जखमी झाले होते. यानंतर दबावात येउन दुसऱ्याच दिवशी लवप्रीत सिंह तूफानला सोडण्यात आले होते. पोलिसांकडून सांगण्यात आले की, अमृतपालकडून लवप्रीत सिंह तूफानच्या निर्दोषत्वाचे पुरावे सोपवण्यात आले.
या प्रकरणात पंजाबच्या भगवंत मान सरकारवर टीका होत आहे. भाजप, काँग्रेस सहीत अनेक पक्षांनी सुरक्षेच्या मुद्यावरून आपवर टीका केली आहे. अजनालाचे प्रकरणाची केंद्रीय गृह मंत्रालयानेही गंभीर दखल घेतली आहे. दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयाने पंजाब पोलिसांकडून अजनालामध्ये घडलेल्या या घटनेचा अहवाल मागितला आहे.
दरम्यान पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री भगवंत मान यांनी अमृतपालशी संबंधीत प्रश्नांवर आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, काय तुम्ही फक्त १००० लोकांना पूर्ण पंजाब समजता का? काही लोक आहेत, ज्यांना पाकिस्तान तसेच अन्य देशातून फंडिग होते. राजस्थानची बॉर्डरही पंजाबपेक्षा मोठी आहे, मात्र तेथे ड्रोन येत नाहीत. पंजाब मध्येच का येतात. कारण त्यांना पंजाब अशांत बनवायचा आहे. मात्र तसे होणार नाही. पंजाबमध्ये शांती आणि बंधुभाव कायम आहे. राज्य प्रगतीच्या दिशेने चालले आहे.
अजनालच्या पोलिसांनी १८ फेब्रुवारीला दंगा आणि अपहरणाच्या आरोपात लवप्रीत सिंह तूफानला अटक केली होती. यानंतर लवप्रीतला सोडून देण्याच्या मागणीसाठी 'वारिस पंजाब दे' संघटनेचे प्रमुख अमृतपाल सिंह यांनी आपल्या समर्थकांसोबत आंदोलन केले. अमृतपाल सिंहच्या समर्थकांनी लवप्रीत सिंह तूफानला जेलमधून बाहेर काढण्यासाठी पोलिस स्टेशनवर बंदुका आणि तलवारींसह हल्ला चढवला. यानंतर दुसऱ्या दिवशी लवप्रीत सिंह तूफानला सोडून देण्यात आले होते.
हेही वाचा :