Deepinder Goyal Stepping Down: फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोची पेरेंट कंपनी इटर्नल लिमिटेडचे सीईओ दीपिंदर गोयल यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत शेअर होल्डरची परवानगी घेण्यात येत आहे. असं असलं तरी ते कंपनीच्या संचालक मंडळावर व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत राहणार आहे.
दीपिंदर गोयल यांनी सोशल मीडियावर आपला राजीनामा पोस्ट केला. ते आपल्या पोस्टमध्ये लिहितात की, 'प्रीय शेअरहोल्डर्स, आज मी या ग्रुपच्या सीईओ पदाचा राजीनामा देत आहे. माझा राजीनामा शेअरहोल्डर्सकडे अप्रुव्हलसाठी ठेवण्यात आला आहे. मी कंपनीच्या संचालक मंडळावर व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत राहणार आहे.
दीपिंदर गोयल यांनी राजीनामा देण्याचे कारण स्पष्ट केलं. ते म्हणाले, की, 'उशीरा का होईना मला मी नवीन कल्पना ज्या खूप धाडसी आणि प्रयोगशील आहेत त्या सुचत आहेत. या अशा कल्पना आहेत ज्या इटर्नल सारख्या पब्लिक लिमीटेड कंपनीच्या बाहेर राहूनच योग्यप्रकारे कार्यान्वित करता येतील.'
झोमॅटोचे सीईओ पुढे म्हणाले, 'जर या कल्पना इटर्नल्सच्या स्ट्रॅटेजिक स्कोपमध्ये बसत असत्या तर मी त्या कंपनीत राहूनच पूर्णत्वास नेल्या असत्या. या कल्पना कंपनीच्या स्ट्रॅटजीमध्ये बसत नाहीत आणि इटर्नलचा फोकस आणि शिस्त तशीच रहावी म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी इटर्नलमध्ये जे करत होतो ते करतच राहणार आहे. त्याचबरोबर मी नवीन कल्पना कंपनीच्या बाहेर राहून एक्सप्लोर करणार आहे. भारतातील पब्लिक कंपनीच्या साईओकडूनच्या अपेक्षा, कायदेशीर बाजू याबाबत वेगळ्या अपेक्षा असतात.'