Crime News Youth Killed Stopping Robbers :
दिलशान गार्डनमध्ये बुधवारी सांयकाळी एक धक्कादायक घटना घडली. २३ वर्षाचा वरीश राठोड आपली मैत्रिण भावना सोबत दिलशान गार्डन येथील डीअर पार्कमध्ये गेला होता. तिथं ४ गुंडांनी तिच्या मैत्रिणीची पर्स लूटण्याचा प्रयत्न केला. याला वीरेश राठोडनं प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मात्र गुंडांनी राठोडवर चाकू हल्ला केला. हा हल्ला इतका जबर होता की २३ वर्षाचा वरीश राठोड गंभीर जखमी झाला.
दरम्यान, लूट करणारे गुंड भावनाची पर्स आणि फोन घेऊन फरार झाले. पर्समध्ये १० हजार रूपये होते. पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा प्रयत्नासह अनेक कलमं लावून गुन्हा दाखल केला. मात्र रात्री उशिरा उपचारादरम्यान राठोडचा मृत्यू झाला. त्यानंतर पोलिसांनी हत्येचं कलम देखील अॅड केलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 'विरेश आपल्या कुटुंबासह दिलशान गार्डनमध्ये राहतो. आई-वडील, मोठी बहीण आणि मोठा भाऊ असा त्याचा परिवार आहे. वरीश हा आई-वडिलांसोबत राहतो तर तर मोठा भाऊ गावाकडे राहतो. बहिणीचं लग्न झालं आहे. विरेश कुटुंबातील सर्वात छोडा मुलगा होता. वीरेश हा भावनासोबत सीसीटीव्ही कॅमऱ्यासंबंधीचं काम करत होता.
मृत राठोडच्या आईनं सांगिलं की, बुधवारी विरेश नोकरीवर गेला होता. दुपारी ३ वाजता तो कामावर गेला होता. त्यानंतर पोलिसांनी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास वरीशवर चाकू हल्ला झाल्याची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबातील सर्वजण रूग्णालयात गेले. तिथं रात्री उशिरा विरेशचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं.
विरेशची मैत्रिण ही विवाहित आहे. तिला तीन मुलं आहे. पोलिसांनी सांगितलं की विरेश आणि भावना हे गार्डनमध्ये बसले होते. त्यावेळी काही गुंड आले आणि त्यांनी चाकूचा धाक दाखवून लूटण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भावनाची पर्स लूटली. वीरेशने याला विरोध केला. मात्र गुंडांनी त्याचावर चाकूनं हल्ला केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर गुंड लूट घेऊन पळून गेले.
दरम्यन, जखमी झालेल्या वीरेशला घेऊन भावना रस्त्यावर आली. त्यानंतर एका स्कूटर चालकानं या दोघांना जीटीबी रूग्णालयापर्यंत पोहचवलं. वीरेशचे कुटुंबीय हे उत्तर प्रदेशच्या बरेलीचे राहणारे आहेत. ते दिल्लीत वेग वगेळ्या ठिकाणी राहत होते. दिलशाद गार्डनमध्ये ते गेल्या दीड वर्षापासून राहतात.
विशेष म्हणजे डीअर पार्कमध्ये त्या संध्याकाळी खूप लोक होते. काही वॉक करत होते तर काहीजण बसले होते. गुंडांनी वीरेशच्या मानेवर चाकूनं हल्ला केला. भावना त्यानंतर ओरडत होती. मात्र जवळपासच्या लोकांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ते इकचे तिकडे पाहत राहिले आणि तमाशा बघत राहिले. त्यांच्या या बघ्याच्या भूमिकेमुळं आज वीरेशला आपला जीव गमवावा लागला. कोणीही गुंडांना रोखण्याची हिम्मत दाखवली नाही. त्यामुळं गुंड चोरी करून, हल्ला करून आरामात पळून गेले.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेनंतर भावना हादरून गेली होती. ती वीरेशची मदत करत होती. त्यात वीरेशच्या रक्तानं ती माखली गेली. त्यानंतर एक व्यक्ती त्यांच्या मदतीला आला. दरम्यान, पोलीसांनी सीसीटीव्हीच्या मदतीनं तपास सुरू केला. याच आधारे ते आरोपींपर्यंत पोहचले. पोलिस तपास करत नंद नगरीपर्यंत पोहचले. त्यानंतर त्यांनी चार आरोपींना पकडलं. यातील दोन अल्पवयीन आहेत. त्याच्याकडून लूटलेली बॅग देखील मिळाली आहे.