Kangana Ranaut Yogi Adityanath Mother Death: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्री सावित्री देवी यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर राजकीय आणि मनोरंजन क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावतनेही सोशल मीडियावर या दुःखद घटनेबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. कंगनाने योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.
कंगना राणावतने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर एक भावनिक मेसेज शेअर केला. तिने लिहिले, ‘सर्वात दुःखद बातमी! माझे बंधू योगीजी यांच्या मातोश्रींचे उत्तराखंडमध्ये वयाच्या ९१व्या वर्षी निधन झाले. ॐ शांती!’
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आई सावित्री देवी यांनी वयाच्या ९१व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यातील पंचूर या त्यांच्या मूळ गावी असलेल्या घरात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
विशेष म्हणजे, ज्या वेळी सावित्री देवी यांचे निधन झाले, त्या वेळी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ एका सरकारी कार्यक्रमात होते. या कार्यक्रमात ते तरुण आणि महिला सक्षमीकरणाशी संबंधित उपक्रमांतर्गत तरुणांना टॅबलेटचे वाटप करत होते.
कार्यक्रम सुरू असतानाच त्यांना मातोश्रींच्या निधनाची दुःखद बातमी मिळाल्याची माहिती समोर आली आहे. योगी आदित्यनाथ यांच्या मातोश्रींच्या निधनाची बातमी समजल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरून शोक व्यक्त केला आहे.