यशश्री शिंदे हत्या प्रकरण : आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी file photo
राष्ट्रीय

Yashshri Shinde murder case | यशश्री शिंदे हत्या प्रकरण : आरोपी दाऊद शेखला सात दिवसांची पोलीस कोठडी

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : उरणमधील यशश्री शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेख याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. उरण पोलिसांनी मंगळवारी शेख याला मोठ्या शिताफीने गुलबर्गामधून (कर्नाटक) अटक केली होती. त्यानंतर त्याला आज मुंबईतील कोर्टात हजर करण्यात आले. प्रेम प्रकरणातून हत्या केल्याची कबुली त्याने दिली आहे.

यशश्री मैत्रिणीकडे जाते, असे सांगून गेली ती परतलीच नाही...

२५ जुलैला यशश्री मैत्रिणीकडे जाते, असे सांगून घरातून निघाली होती; पण रात्री उशीर होऊनही ती परतलेली नव्हती. त्यामुळे कुटुंबीयांनी पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह आढळून आला. यशश्री बेपत्ता झाल्याची तक्रार कुटुंबीयांनी दिल्यानंतर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवली. त्यावेळी यशश्रीच्या कॉल रेकॉर्डस्वरून एका नंबरवर तिचे सातत्याने बोलणे होत असल्याचे समोर आले होते. पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली आणि दाऊदला बेड्या ठोकल्या आहेत. हत्येनंतर मारेकरी कर्नाटकात त्याच्या मूळ गावी पसार झाला होता. पोलिसांची दोन पथके कर्नाटकात होती.

तरुणी दुसऱ्याच्या संपर्कात आल्याचा राग

दाऊद शेख पीडितेला २०१९ पासून ओळखत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून यशश्रीच्या पालकांनी त्याच्याविरोधात 'पोक्सो' अंतर्गत गुन्हाही दाखल केला होता. यामुळे त्याला ६ महिने तुरुंगवास भोगावा लागला होता. तुरुंगातून सुटून आल्यानंतर तो कर्नाटकातील त्याच्या गावी गेला. तिथे तो बसचालक म्हणून काम करत होता. या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. परंतु, यशश्री दुसऱ्या मुलाच्या संपर्कात आल्याने दाऊदला राग होता. (Yashshri Shinde murder case)

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT