राष्ट्रीय

BRICS Summit 2026 : PM मोदींनी आयोजित केलेल्‍या 'ब्रिक्स' स्नेहभोजनाला चीनचे अध्‍यक्ष शी जिनपिंग यांची दांडी!

इतर जागतिक नेत्यांची आणि मुख्यमंत्र्यांची उपस्थिती; जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचे स्पष्ट कारण अस्पष्ट

पुढारी वृत्तसेवा

XI Jinping Skips BRICS Gala Dinner : ब्रिक्स' परिषदेसाठी आलेल्या सदस्य देशांचे प्रमुख, इतर सहभागी देश आणि आंतरराष्ट्रीय संघटनांच्या प्रतिनिधींसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी (दि. १२ सप्‍टेंबर) आयोजित केलेल्या शाही स्नेहभोजनाला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग उपस्थित राहिले नाहीत, असे वृत्त 'इंडिया टूडे'ने दिले आहेत. या परिषदेत सहभागी झालेले अबु धाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद हेदेखील या भोजनाला उपस्थित राहिले नाहीत.

जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचे स्पष्ट कारण अस्पष्ट

जिनपिंग यांच्या अनुपस्थितीचे नेमके कारण लगेच समजू शकलेले नाही. तथापि, परिषदेच्या भागदौडीनंतर ते विश्रांतीसाठी हॉटेलवर परतल्याचे सूत्रांनी सांगितले. जिनपिंग शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल झाले होते. त्यांनी ब्रिक्स परिषदेला हजेरी लावली आणि पंतप्रधान मोदींसोबत द्विपक्षीय बैठकही घेतली. सात वर्षांनंतर ते भारत दौऱ्यावर आले आहेत.

पुतिन यांच्यासह ब्रिक्सचे इतर प्रमुख नेते स्नेहभोजनाला उपस्थित

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासह ब्रिक्सचे इतर प्रमुख नेते या स्नेहभोजनाला उपस्थित होते. केंद्र सरकारमधील केंद्रीय मंत्री अमित शाह, निर्मला सीतारामन, पीयूष गोयल, अश्विनी वैष्णव आणि शिवराज सिंह चौहान यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

भाजप शासित राज्‍यातील मुख्‍यमंत्रीही उपस्‍थित

याशिवाय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

खांडवी ते शाहतूत फिरणी! स्नेहभोजनात नेत्यांसाठी खास पदार्थांची रेलचेल

केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्री संसद भवनातून दोन बसद्वारे भारत मंडपम येथील स्नेहभोजनाच्या ठिकाणी पोहोचले. या भोजनाच्या मेनूमध्ये खांडवी मिल-फ्युइल, खुंब गलोटी, पनीर लबाबदार, गुच्छी मार्मिक, कॅरट-बीन पोरियल आणि मिलेट पुलाव यांचा समावेश होता. गोड पदार्थांमध्ये जुन्या दिल्लीतील फ्रूट क्रीमसोबत जिलेबी आणि शाहतूत फिरणीचा समावेश होता. दरम्‍यान, १२ आणि १३ सप्टेंबर रोजी आयोजित ब्रिक्स परिषदेत ११ सदस्य देश, १० भागीदार देश आणि काही आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख सहभागी झाले आहेत. या स्नेहभोजनाला ब्रिक्सचे अनेक नेते आणि भारतातील मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT