BRICS summit | पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग, पुतिन एकत्र : ब्रिक्स परिषदेतील तिन्ही नेत्यांचे छायाचित्र चर्चेत!

BRICS summit | पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग, पुतिन एकत्र : ब्रिक्स परिषदेत तिन्ही नेत्यांचे छायाचित्र राजकीय वर्तुळात चर्चेत!
BRICS summit | पंतप्रधान मोदी, शी जिनपिंग, पुतिन एकत्र : ब्रिक्स परिषदेत तिन्ही नेत्यांचे छायाचित्र राजकीय वर्तुळात चर्चेत!
Published on
Updated on

नवी दिल्ली : ब्रिक्स परिषद २०२६च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे एकत्रित छायाचित्र चर्चेचा विषय ठरले आहे. या छायाचित्रात तिन्ही नेते हसतमुख दिसत असून पंतप्रधान मोदी यांनी जिनपिंग आणि पुतिन यांचे हात धरलेले दिसत आहेत.

ब्रिक्सच्या व्यासपीठावर भारत, चीन आणि रशियाच्या प्रमुख नेत्यांची ही एकत्रित उपस्थिती विशेष लक्षवेधी ठरली आहे. तीनही देशांमधील संबंध आणि जागतिक राजकारणातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या छायाचित्राकडे राजनैतिक वर्तुळाचे लक्ष वेधले गेले आहे. ब्रिक्स परिषदेत पंतप्रधान मोदी यांनी जागतिक प्रशासनात बदलाची गरज अधोरेखित करत दहा सूत्रीय प्रस्ताव मांडला. तसेच भारत कोणाच्याही विरोधात नसल्याचा संदेश त्यांनी ब्रिक्सच्या मंचावरून दिला. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसह जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भूमिका मांडली.

दरम्यान, भारत आणि चीनच्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांची भेटही महत्त्वाची ठरली. दोन्ही नेत्यांमधील चर्चेकडेही आंतरराष्ट्रीय राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. ब्रिक्स परिषदेसाठी पुतिन आणि जिनपिंग भारतात दाखल झाले आहेत. परिषदेदरम्यान विविध देशांच्या नेत्यांमध्ये द्विपक्षीय आणि बहुपक्षीय चर्चा होत आहेत. याच पार्श्वभूमीवर मोदी, जिनपिंग आणि पुतिन यांचे एकत्रित छायाचित्र समोर आल्याने त्याला विशेष राजनैतिक महत्त्व प्राप्त झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news