world laughter day 2025 : health benefits of laughter and smiling news
पुढारी ऑनलाईन :
हसणे हा मानवाला मिळालेला एक दागिना आहे असच म्हणाव लागेल. कारण हसणारी व्यक्ती ही प्रत्येकालाच आवडते. तोंड पाडून बसलेल्या व्यक्तीकडे असं म्हणतात की जगही तोंड फिरवते. हसणे म्हणजे फक्त चेहऱ्यावरचे भाव प्रकट करणेच नाही तर आपल्या शरीर आणि मेंदूसाठीही हे एक टॉनिक आहे. पण मग काय फक्त मनुष्यच हसू शकतो का? तर याचे उत्तर नाही असेच आहे, कारण प्राणीही हसतात. ते कसे चला पाहूयात....
आपण नेहमी विचार करत असतो की, हास्य हे फक्त माणसासाठीच मर्यादित आहे का? मात्र संशोधन सांगते की, प्राणीही हसतात. UCLA च्या संशोधनानुसार, ६५ हून अधिक प्राणी हे हास्यासारखा आवाज काढतात. कुत्रे, उंदीर, माकड, डॉल्फिन, गाय, सील आणि ऑरंगुटान हे जेंव्हा खेळतात आणि आनंदीत होतात तेंव्हा हसण्यासारखा आवाज काढतात.
प्रत्येक प्राण्याच्या हसण्याची पद्धत वेगळी असते.
उंदीर हे नाजुक चिरपिंप.... सारखा आवाज काढतात. जो अल्ट्रासोनिक असतो.
कुत्रे खेळताना विशिष्ट आवाज काढतात. ज्यामुळे समोरचा कुत्राही खेळण्यासाठी प्रेरित होतो.
माकड आणि डॉल्फिनही दंगा मस्ती करताना खास आवाज काढतात. ते हास्य आहे असे जाणवते.
मात्र, या लिस्टमध्ये मांजराचा समावेश नाही. त्यांचे संदेशवहन थोडे वेगळे असते. त्यामुळे हे हसण्याचा असा कोणताही स्पष्ट आवाज काढत नाही.
हास्य हे फक्त आपला मूडच ठिक करत नाही, तर शरीरालाही अनेक फायदे मिळवून देते.
हसण्यामुळै एंडोर्फिन नावाचे एक रसायन स्त्रवते. ज्यामुळे आपल्याला आनंद वाटतो. तणावही कमी होतो.
यामुळे शरीरातील इम्युन सेल्स आणि ॲटीबॉडीज वाढतात. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
हास्यामुळे हद्याचा रक्त प्रवाह सुरळीत होतो. ज्यामुळे हार्ट अटॅक आणि ब्लड प्रेशरची समस्या कमी होते.
हास्य हे एक नैसर्गिक वेदनाशामक औषधाप्रमाणे काम करते. ज्यामुळे दुखण्यामध्ये आराम मिळतो.
आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजणे आपले हास्य विसरलेला आहे. मात्र हास्य हे आपल्या निरामय जीवनासाठी आवश्यक आहे. हास्य हे फक्त आपल्या चेहऱ्यावर चमकच आणत नाही तर आपल्याला अंतरंगातून मजबूत करण्यासही मदत करते. त्यामुळे आजच्या जागतिक हास्य दिनादिवशी आपण एक संकल्प करूया की, रोज थोड्या वेळासाठी खुलून हसायचे दुसऱ्यासाठी नाही तर स्वत:साठी.....