Indian spy planes Pudhari
राष्ट्रीय

Indian spy planes | काय असते स्पाय प्लेन? लवकरच एअरफोर्समध्ये दाखल होणार; भारताचा 10,000 कोटींचा मास्टरप्लॅन

Indian spy planes | ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान मोठा निर्णय! DRDOची कमाल; अमेरिकेसारख्या I-STAR विमानांची तयारी अंतिम टप्प्यात, विमानातून शत्रूवर अचूक नजर

Akshay Nirmale

Indian spy planes DRDO I-STAR project High-tech surveillance aircraft ₹10,000 crore defence project Indian Air Force upgrades

नवी दिल्ली : भारत लवकरच अत्याधुनिक I-STAR (Intelligence, Surveillance, Target Acquisition and Reconnaissance) गुप्तचर विमाने असणाऱ्या देशांच्या पंक्तीत सामिल होणार आहे. सुमारे 10,000 कोटींच्या या संरक्षण प्रकल्पाला जूनच्या चौथ्या आठवड्यात होणाऱ्या उच्चस्तरीय बैठकीत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय हवाई दलासाठी हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.

या हाय-टेक surveillance aircraft मध्ये DRDO द्वारा विकसित स्वदेशी तंत्रज्ञान वापरले जाणार असून, शत्रूच्या हालचालींवर हवेतून अचूक लक्ष ठेवण्याची क्षमता भारतीय सैन्याला प्राप्त होणार आहे. अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलसारख्या देशांकडे अशी विमाने आहेत. आता भारतही त्या पंक्तीत सामिल होणार आहे.

DRDOच्या स्वदेशी प्रणाली परदेशी विमानांवर बसवणार

या प्रकल्पाची धुरा डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) च्या हाती आहे. तीन विमानांची खरेदी खुल्या निविदेद्वारे करण्यात येणार असून, बोईंग आणि बॉम्बार्डियर यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांची विमाने या प्रक्रियेसाठी विचाराधीन आहेत.

परंतु, या विमानांमध्ये बसवले जाणारी सर्व गुप्तचर, सर्व्हेलन्स आणि लक्ष्यीकरण यंत्रणा या पूर्णतः स्वदेशी असतील. DRDOच्या सेंटर फॉर एअरबोर्न सिस्टिम्स (CABS) ने या प्रणालींचा विकास यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

आणि आता त्या निवडलेल्या विमानांवर बसवून I-STAR मानकांनुसार रूपांतर करण्याचे काम केले जाणार आहे.

I-STAR ची महत्त्वाची भूमिका

ही विमाने भारतीय हवाई दलाला अत्यंत प्रगत अशी हवाई ते जमिनीवरील माहिती संकलन क्षमता देतील. ज्यामुळे शत्रूच्या रडार, हवाई संरक्षण प्रणाली आणि हालचाल करणाऱ्या युनिट्सवर अचूक हल्ले शक्य होतील.

या प्रणालींमुळे वास्तविक वेळेतील, बहुपरिमिती (multi-spectral) निरीक्षण करून शत्रूच्या हालचाली ट्रॅक करता येणार आहेत. त्यामुळे युद्ध किंवा सर्जिकल स्ट्राईकसारख्या मोहिमांमध्ये अचूक व वेळेवर निर्णय घेता येतील. ही प्रणाली गुप्त, दुर्बोध आणि तात्काळ धोके ओळखण्यात व त्यांच्याशी सामना करण्यात मदत करेल.

ही प्रणाली गतिशील आणि वेळ-संवेदनशील लक्ष्यीकरण (time-sensitive targeting) करण्याची क्षमता देते. या प्रणालीद्वारे शत्रुची हालचाल शोधणे, स्थान निश्चित करणे आणि निरीक्षण करणे शक्य होईल.

आंतरराष्ट्रीय दर्जाची पातळी

I-STAR क्षमतांमुळे भारत अमेरिकेप्रमाणेच युके आणि इस्रायलसारख्या उच्च संरक्षण तंत्रज्ञान असलेल्या देशांच्या रांगेत सामिल होणार आहे. ही विमाने उंचीवरून आणि दूरवरून काम करू शकतील. तसेच दिवसा आणि रात्री दोन्ही वेळी लांब पल्ल्यांवरून (stand-off ranges) गुप्तचर माहिती संकलन, निरीक्षण, लक्ष्यीकरण व टार्गेटिंग असे मिशन पार पाडण्यास ही विमाने सक्षम असतील.

त्यामध्ये हवाई तसेच भूमिगत घटकांचा समावेश असेल. त्याद्वारे गुप्तचर प्रक्रिया, विश्लेषण, प्रसारण आणि सैन्य दलांसाठी एकसंध ऑपरेशनल चित्र (common operating picture) तयार करण्यात येईल.

या प्रकल्पामुळे भारतीय सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम होणार असून, दहशतवादी आणि शत्रूंच्या गुप्त हालचाली वेळेत हेरून त्या नष्ट करण्यासाठी ही प्रणाली महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक पाऊल

I-STAR प्रकल्पाला मिळणारी मान्यता भारताच्या संरक्षण धोरणातील एक मोठा टप्पा असेल. स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून परदेशी व्यासपीठांवर आधारित अत्याधुनिक प्रणाली तयार करण्याचा हा प्रयोग आत्मनिर्भर भारताच्या दिशेने एक ठोस पाऊल ठरेल.

या निर्णयामुळे भारताची सीमावर्ती भागांमधील सुरक्षा आणि माहिती संकलन क्षमता भक्कम होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT