राष्ट्रीय

Arvind Kejriwal: अमित शहा असतील मोदींचे वारसदार : केजरीवालांचा दावा

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन डेस्क: तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal) लोकसभा प्रचारामध्ये सक्रिय झाले आहेत. सध्या ते उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज (दि.१६) त्‍यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्‍या समवेत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा  हेच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वारसदार असतील, असा दावा त्‍यांनी यावेळी केला.

या वेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  म्हणाले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी १७ सप्टेंबर २०२५ रोजी ७५ वर्षांचे होतील. पीएम मोदींनी अमित शहा यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवण्याचा आणि 17 सप्टेंबर 2025 रोजी त्यांना पंतप्रधान बनवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी ते वयाच्या ७५ वर्षानंतर निवृत्त होत असल्याचे अद्याप स्पष्ट केले नाही. पण पंतप्रधान मोदींनी हा नियम बनवला आहे मला पूर्ण आशा आहे की ते या नियमाचे पालन करतील."

केजरीवाल काय म्हणाले?

  • मोदी अमित शहांसाठी मते मागतायंत
  • मोदी पक्षातून निवृत्त झाल्यास, गॅरंटी पूर्ण कोण पूर्ण करणार ?
  • मोदींना देशात 'वन नेशन वन लिडर' धोरण राबवायचंय
  • मोदी पुन्हा सत्तेत आल्यास विरोधकांची जेलवारी

"भाजपला 220 पेक्षा कमी जागा मिळत असल्याचे ट्रेंड दाखवतात. हरियाणा, दिल्ली, पंजाब, कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, यूपी, बिहार, झारखंड आणि राजस्थानमध्ये त्यांच्या जागा कमी होणार आहेत. भाजप आपले सरकार स्थापन करणार नाही तर 'इंडिया' आघाडी आपले सरकार स्थापन करेल, असा विश्वासही केजरीवाल यांनी यावेळी व्यक्त केला.

यापूर्वी आज आम्हाला विचारले जात आहे की, 'इंडिया' आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? पण मी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विचारत आहे की, त्यांचानंतर भाजपचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे? असा सवाल दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी  ११ मे राेजी केला हाेता.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT