Viral Video
नवी दिल्ली : विवाहबंधनात अडकून १५ वर्षे झाली असतानाही पत्नीने विवाहबाह्य संबंध तोडण्यास नकार दिल्याचा आणि तिच्या प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ पकडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीच्या सततच्या फसवणुकीला कंटाळून पतीने तिची अॅक्टिव्हा स्कूटर ट्रॅक करण्यासाठी GPS ट्रॅकर लावला होता आणि या ट्रॅकरमुळेच तिचा भंडाफोड झाला.
रवी गुलाटी नावाच्या पतीने स्वतःचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ही हृदयद्रावक माहिती दिली आहे. या व्हिडिओमध्ये तो रडत-रडत आपला अनुभव सांगताना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये रवी गुलाटी याने सांगितले की, "माझं नाव रवी गुलाटी आहे. माझं लग्न २५ एप्रिल २०१० रोजी अनिल कुंद्रा यांची कन्या हिमानी दसूआ हीच्याशी झालं होतं. माझ्या पत्नीला याआधी २०१८ मध्येही एका हॉटेलमध्ये कोणासोबत तरी अनैतिक संबंधात पकडले गेले होते. त्यावेळीही मी तिला ताकीद दिली होती."
गुलाटी पुढे सागतो, "मी तिच्या आई-वडिलांना बोलावले; ते इथे आले आणि त्यांनी तिला समजावले. तिच्या आई-वडिलांनीही माझी माफी मागितली आणि तिनेही मागितली. मी त्यावेळी माफ केले. मी म्हणालो की मुले लहान आहेत, ठीक आहे, चुका होतात. पण, आज माझी पत्नी दुपारी सुमारे साडेतीन वाजता घरातून निघाली."
पत्नीने वारंवार केलेल्या फसवणुकीमुळे पती रवी गुलाटीचा तिच्यावर संशय होता. घटनेच्या दिवशी त्याने पुन्हा पत्नीवर संशय आला, म्हणून तिला अनेकवेळा फोन केला. तो व्हिडिओमध्ये सांगत आहे की, "मी तिला कमीत कमी १५-२० वेळा फोन केला पण, तिने माझा फोन उचलला नाही. फोन उचलत नसल्यामुळे ॲक्टिव्हावर जीपीएस ट्रॅक लावला होता. त्या आधारे शोधत-शोधत ज्ञानी लस्सीवाला या ठिकाणी पोहोचलो, तिथे पत्नी आणि तिचा प्रियकर एकत्र हॉटेलमध्ये आढळले."
या घटनेनंतर पतीने संतापून हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून, पत्नीच्या या कृत्यामुळे त्यांच्या वैवाहिक जीवनात मोठा तणाव निर्माण झाला आहे.