Influencer Couple Ashwin Priyanka Pudhari
राष्ट्रीय

Bikewala couple: शेवट तुम्ही ठरवून केलात, पुढे काय हा प्रश्नच... ; मराठी Influencer दाम्पत्याची सोशल मीडियावरून Exit

Bikewala Couple quits Social Media: इन्फ्लुएन्सर दाम्पत्याची शेवटची पोस्ट चर्चेत, काय म्हटलंय त्यांनी त्यात?

दीपक दि. भांदिगरे

Why did Bikewala Couple quit social media?

मुंबई : सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असलेल्या इन्फ्लुएन्सर दाम्पत्याची शेवटची पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. अश्विन आणि प्रियांका (Ashwin priyanka) असे या दाम्पत्याचे नाव आहे. Bikewala couple या नावाने हे दाम्पत्य सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. त्यांनी अचानक मोठा निर्णय घेत सोशल मीडियाला अलविदा केला आहे.

''तुम्ही आजवर दिलेल्या प्रेमासाठी आम्ही प्रचंड आभारी आहोत. अखेरचा नमस्कार! कसलाही गैरसमज करून घेऊ नका. आम्ही संपूर्ण कुटुंबाने ठरवून हा निर्णय घेतला आहे. आम्ही सगळे मजेत आहोत आणि एकमेकांच्या सोबत आहोत.'' असे बाईकवाला कपलने बुधवारी (दि.२ जुलै) इन्स्ट्राग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

'शेवट तुम्ही ठरवून केलात....'

''नमस्कार, प्रत्येक गोष्टीला एक शेवट असतो आणि तो शेवट तुम्ही ठरवून केलात तर तो जास्त आनंददायी ठरतो. तुम्ही आजवर दिलेल्या प्रेमाबद्दल तुमचे खूप खूप आभार. यापुढे काय? हा प्रश्न माझ्याही समोर आहे. पण सापडले त्याचही उत्तर...Instagram, YouTube वरची ही शेवटची पोस्ट. शेवटी एवढंच माणूसच माणसाच्या कामी येणार आहे. त्यामुळे नाती जपा, टिकवा, वाढवा आणि समृद्ध करा,'' असा सल्ला त्यांनी यूजर्संना दिला आहे.

इन्स्टाग्राम युट्यूबवर लाखो फॉलोअर्स

या दाम्पत्याचे इन्स्टाग्राम आणि युट्यूबर १ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांच्या इन्स्टाग्रामवर 858 पोस्ट्स आहेत. तर YouTube वर त्यांचे 455 videos आहेत. 'लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी' अशी या इन्स्टाग्राम हँडलची टॅगलाईन आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT