Government Emergency Alert pudhari
राष्ट्रीय

Government Emergency Alert: कोणाला येणार नाही सरकारचा इमर्जन्सी अलर्ट? सेल ब्रॉडकास्टर सिस्टमलाही आहेत मर्यादा

Anirudha Sankpal

Government Emergency Alert: आज (दि. २ मे २०२६) देशभरातील अनेक लोकांच्या मोबाईलवर जोरदार अलार्म वाजला. केंद्र सरकारने सेल ब्रॉडकास्ट सिस्टमचे मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग केलं. आता जरी याचे टेस्टिंग झाले असले तरी आगामी काळात ही सर्व्हिस सामान्य लोकांसाठी नियमित स्वरूपात वापरण्यात येणार आहे. ज्यावेळी एखादे मोठे संकट आले, भूकंप, पूर, वादळ किंवा काही सुरक्षेचा धोका असेल तर सरकार थेट तुमच्या मोबाईलवर जोरदार आवाजासह एक इमर्जन्सी अलर्ट पाठवणार आहे.

ना इंटरनेट ना अॅपची गरज

हा काही कोणता एसएमएस नसून टॉवरमधून एकाचवेळी संपूर्ण भागात हा प्रसारित होणारा हा मेसेज असणार आहे. हा अलर्ट मोबाईलवर येण्यासाठी ना इंटरनेट ना कोणत्या अॅपची गरज भासणार आहे. कमी नेटवर्कमध्ये देखील हा अलर्ट तुमच्या मोबाईलवर येणार आहे. मात्र यासाठी एक अट आहे.

या सिस्टमची सर्वात महत्वाची बाब म्हणजे कमी नेटवर्कमध्ये देखील ही काम करते. ज्यावेळी कॉल ड्रॉप होत असेल. इंटरनेट सुरू नसेल. त्यावेळी देखील हा अलर्ट येण्याची शक्यता आहे. कारण हा अलर्ट कोणत्या एमएमएससारखा एका ओळीत येत नाही. हा अलर्ट थेट टॉवरवरून पुश केला जातो. मात्र तुमच्या मोबाईलमध्ये पूर्णपणे नेटवर्क डाऊन आहे आणि नो सर्व्हिस असा संदेश येत असेल. टॉवरकडून कोणताच सिग्लन मिळत नसेल त्यावेळी ही सिस्टम काम करणार नाही.

सीम नसतानाही मिळणार अलर्ट

येणाऱ्या काळात या सिस्टमची अजून एक खास गोष्ट सर्वांना धक्का देऊ शकते. ही सिस्टम नंबरवर नाही तर एरियावर काम करते. म्हणजे जर तुमचा फोन ऑन असेल कोणतेही नेटवर्क पकडत असेल तर सीम नसतानाही हा इमर्जन्सी अलर्ट तुमच्या स्क्रीनवर दिसू शकतो. ही सिस्टम आपत्कालीन काळात संवादाचे एक उपयुक्त टूल मानलं गेलं आहे.

कोणाला मिळणार नाही हा अलर्ट

जरी ही सिस्टम खूप प्रगत असली तरी पूर्णपणे फुलप्रूफ नाहीये. ज्या क्षेत्रात नेटवर्क येत नाहीत त्या भागातील लोकांना हा अलर्ट मिळू शकत नाही. तसेच ज्यांचा मोबाईल फोन बंद आहे किंवा बॅटरी संपली आहे. त्यांना देखील हा अलर्ट मिळणार नाहीये.

जर तुमचा मोबाईल एअरप्लेन मोडला असेल तर तुम्हाला नेटवर्क मिळणार नाही. त्यावेळ देखील तुम्हाला हा अलर्ट मिळण्याची शक्यता नाही. अनेकवेळा युजर्स स्वतः सेटिंगमध्ये जाऊन इमरजन्सी अलर्ट बंद डिसेबल करतात अशा परिस्थिती तदेखील तुम्हाला हा अलर्ट मिळणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT