AVM Shakti Sharma pudhari
राष्ट्रीय

AVM Shakti Sharma: हवाई दलाच्या पहिल्या एअर वाईस मार्शल होऊन इतिहास रचणाऱ्या शक्ती शर्मा कोण आहेत?

Anirudha Sankpal

AVM Shakti Sharma: भारतीय हवाई दलात एक ऐतिहासिक पोस्टिंग झालं आहे. शक्ती शर्मा या हवाई दलातील पहिल्या महिला एअर वाईस मार्शल ( अवैद्यकीय) झाल्या आहेत. संरक्षण मंत्रालयाने रिलीज केलेल्या प्रेस रिलीजनुसार शर्मा या पोस्टला त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून न्याय देतील असं म्हटलं आहे. त्यांनी अनेक ट्रेनिंग स्टेशनमध्ये, फिल्ड स्टेशन, कमांड हेडक्वार्टर आणि एअर हेडक्वार्टमध्ये आपली सेवा बजावली आहे.

कोण आहेत शक्ती शर्मा?

एअर वाईस मार्शल शर्मा या १९९४ मध्ये IAF शिक्षण विभागात रूजू झाल्या होत्या. तेव्हापासून त्यांनी विविध पोस्टिंगवर आणि ट्रेनिंग एस्टॅब्लिशमेंटमध्ये काम केलं आहे. त्या वैद्यकीय शाखेव्यतिरिक्त भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन होणाऱ्या पहिला महिला अधिकारी देखील होत्या.

शक्ती शर्मा यांनी शैक्षणिक आणि संस्थात्मक सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीकोणातून देखील काम केलं आहे. त्यांनी आयआयटी कानपूर आणि पुणे विद्यापीठात IAF चेअर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात देखील मोठी भूमिका बजावली होती.

भारतीय हवाई दलात पहिला एअर वाईस मार्शल बनण्यापूर्वी शर्मा या ट्राय सर्व्हिस टू कमांड सैनिक स्कूलमधून येणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी देखील ठरल्या होत्या. त्यांनी कपूरथला सैनिक स्कूलमध्ये मुख्याध्यापक म्हणून देखील आपली सेवा बजावली आहे.

मंत्रालयाची प्रतिक्रिया

संरक्षण मंत्रालयाने, 'भारतीय संरक्षण दलांमध्ये या ऐतिहासिक कामगिरीनंतर महिला अधिकाऱ्यांसाठी एक नवा अध्याय सुरू होणार आहे. जवळपास तीन दशकांपेक्षा जास्त सेवा दिल्यानंतर शर्मा या पुढच्या पिढीला संपूर्ण अवकाश आपल्या कवेत घेण्याची प्रेरणा देतील.'

शक्ती शर्मा यांची AVM म्हणून नियुक्ती होणे हा आर्म फोर्सेसमध्ये महिलांसाठी एक नवीन टप्पा असणार आहे. ज्या महिला अधिकारी १९९० नंतर लष्करात रूजू झाल्या आहेत त्यांच्यासाठी आता वरिष्ठ पदांवर पोहचण्याचा एक मार्ग खुला झाला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT