India - US Trade Deal pudhari photo
राष्ट्रीय

India - US Trade Deal: अमेरिकेने व्यापार करारात केला होता खोडसाळपणा... आता व्हाईट हाऊसनं हळूच पाय मागे खेचले

भारतानं दोन्ही देशांमध्ये करारातील ज्या वर्डिंगवर आणि वस्तूंवर सहमती झाली होती त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करारात समाविष्ट केल्यानं आक्षेप नोंदवला होता.

Anirudha Sankpal

India - US Trade Deal: व्हाईट हाऊसने हळूच भारत-अमेरिका व्यापार करारातील फ्रेमवर्कमध्ये बदल केला आहे. त्यांनी भारत काही डाळींवरील आयात शुल्क घटवल्या असल्याचा दावा आपल्या व्यापार कराराच्या फ्रेमवर्कमधून काढून टाकला आहे. तसेच भारत डिजीटल टॅक्स रद्द करणार असल्याच्या दाव्यापासून देखील माघार घेतली आहे. याचबरोबर ५०० बिलियन अमेरिकन डॉलरचे अमेरिकेची उत्पादने खरेदी करण्याचे आश्वासन भारतातनं दिलं आहे हा मुद्दा देखील वगळण्यात आला आहे.

भारतानं दोन्ही देशांमध्ये करारातील ज्या वर्डिंगवर आणि वस्तूंवर सहमती झाली होती त्यापेक्षा वेगळ्या गोष्टी करारात समाविष्ट केल्यानं आक्षेप नोंदवला होता. या प्रकरणाची माहिती असलेल्या व्यक्तींनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ही माहिती दिली आङे.

काय बदल झाले आहेत?

सोमवारी मूळ ट्रेड शीट सार्वजनिक झाली होती. त्यानंतर ती अपडेट करण्यात आली आहे. सुधारित फॅक्ट शीटमध्ये कृषीविषयक उत्पादनातून काही विशिष्ट डाळींचा उल्लेख काढून टाकला आहे. या डाळींवरील कर भारत कमी करणार असल्याचा दावा केला जात होता. यात ट्री नट्स, सोयाबीन तेल, वाईन आणि स्पिरीट यांच्यासोबत या विशिष्ट डाळींचा समावेश होता.

डाळी हा भारतात राजकीय संवेदनशीलतेचा विषय आहे. भारत हा डाळींचा जगातील सर्वात जास्त उत्पादक आणि ग्राहक देश आहे. अमेरिकेने आपल्या फॅक्ट शीटमधून या डाळींचा उल्लेख वगळला असून भारतासाठी हे मोठे यश मानले जात आहे.

याचबरोबर अमेरिकेने भारत डिजीटल सर्व्हिस टॅक्स देखील रद्द करणार असा दावा केला होता. तो दावा देखील फॅक्ट शीटमध्ये बदलण्यात आला आहे. आता भारत डिजीटल टॅक्स सर्व्हिसबाबत वाटाघाटी करण्यात प्रतिबद्ध असा शब्द घालण्यात आला आहे.

शब्दप्रयोग देखील बदलले

भारताने आधीच डिजीटल अॅडव्हरटाईजिंग सर्व्हसेसवरील लेव्ही इक्वलायझेशन १ एप्रिल २०२५ पासून ६ टक्के कर रद्द केला होता. हा बदल ट्रेड फ्रेमवर्क घोषित होण्यापूर्वी १० महिने आधी करण्यात आला होता.

अमेरिकेने आपल्या फॅक्ट शीटमध्ये तिसरा बदल हा ५०० बिलियन अमेरिकन डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याबाबत करण्यात आला आहे. करारातील या मुद्द्याच्या वर्डिंगमध्ये बदल करण्यात आला असून आता भारताची अमेरिकेची ५०० बिलियन डॉलर्सची उत्पादने खरेदी करण्याची योजना किवा इच्छा (Intends) आहे असा शब्दप्रयोग वापरण्यात आला आहे.

यापूर्वी इथं वचन (Committed) हा शब्द होता. तसेत या मुद्द्यातील शेती उत्पादने हा शब्द काढून टाकून फक्त उत्पादने असा करण्यात आला आहे. व्हाईट हाऊसने केलेल्या या बदलाबाबत त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT