राष्ट्रीय

West Bengal TMC vs BJP politics : टीएमसीचे १७ बंडखोर खासदार भाजपमध्ये प्रवेश करणार, युसूफ पठाणसह तिघांचा NDA ला बाहेरून पाठिंबा

दुर्गापूजेपूर्वी पश्चिम बंगालमध्ये ‘खेला’ : खा. बसुनिया यांचा दावा

पुढारी वृत्तसेवा

West Bengal TMC vs BJP politics

कोलकाता : ममता बॅनर्जी यांची साथ सोडून बंडखोरी केलेले तृणमूल काँग्रेसचे २० पैकी १७ खासदार दुर्गापूजेच्‍या काळात भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार आहेत. बंडखोरांच्‍या गटातील एक असलेले कूचबिहारचे खासदार जगदीश चंद्र वर्मा बसुनिया यांनी सोमवारी हा दावा केला.

खा. बसुनिया यांच्या मते, १७ खासदारांनी (बंडखोरांच्‍या एक तृतीयपेक्षा जास्‍त संख्‍या) एकाच वेळी पक्षांतर करण्याचा निर्णय घेतला आहे, जेणेकरून त्यांच्यावर पक्षांतरबंदी कायदा लागू होणार नाही; तर अबू ताहेर खान, खलीलुर रहमान आणि युसूफ पठाण हे उर्वरित तीन बंडखोर खासदार अल्‍पसंख्‍याक समुदायातील असून ते त्यांच्या मतदारसंघातील राजकीय व प्रशासकीय परिस्थितीमुळे भाजपमध्ये प्रवेशाऐवजी एनडीएला बाहेरून पाठिंबा देतील.

अर्थात त्यांना महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या किंवा पदे दिली जाऊ शकतात. विशेष म्हणजे टीएमसी खासदारांचा हा निर्णय १४ जून रोजी कमी परिचित असलेल्या ‘राष्ट्रवादी नागरिक पार्टी ऑफ इंडिया’ (एनसीपीआय) मध्ये विलीनीकरणाची घोषणा करण्याच्या आणि सत्ताधारी एनडीएला पाठिंबा देण्याच्या सुमारे तीन महिन्यांनंतर समोर आला आहे.

काय सांगतो पक्षांतरबंदी कायदा?

पक्षांतरबंदी कायद्यानुसार, अपात्रतेपासून वाचण्यासाठी विधिमंडळ किंवा संसदीय पक्षाच्या किमान दोन तृतीयांश सदस्यांनी विलीनीकरणासाठी सहमती दर्शवणे आवश्यक आहे. २० सदस्यांच्या एनसीपीआय गटाच्या बाबतीत ही मर्यादा १४ खासदारांची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT