Bengal Election Controversy pudhari
राष्ट्रीय

Bengal Election Controversy: बैठकीत जो अधिकारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना 'भिडला' त्याला दाखवला 'घरचा' रस्ता

Anirudha Sankpal

Bengal Election Controversy: पश्चिम बंगाल निवडणुकीत आज पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे. याचदरम्यान, निवडणूक आयोगाच्या एका उच्चस्तरीय बैठकीत झालेल्या राड्याबाबतची बातमी समोर आली आहे. ही बैठक बुधवारी झाली होती. त्या बैठकीत बंगालमधील एक निवडणूक निरीक्षक थेट मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनाच भिडला. मात्र हे भिडणं त्या अधिकाऱ्याला महागात पडलं आहे. त्याला निरीक्षक पदावरून काढून टाकण्यात आलं आहे.

ज्ञानेश कुमारांवर टिप्पणी

निवडणूक आयोगाच्या पूर्ण बेंचने एक व्हर्च्युअल बैठक घेतली होती. या बैठकीला कूच बिहार दक्षिणचे निरीक्षक अनुराग यादव देखील उपस्थित होते. त्यांनी या बैठकीवेळी मुख्य निवडणूक आयुक्तांवर टिप्पणी केली. या टिप्पणीनंतर बैठकीतील वातावरण चांगलेच तापले. चिडलेल्या ज्ञानेश कुमार यांनी त्या अधिकाऱ्याला घरी जाण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानंतर यादव देखील भडकले आणि त्यांनी तुम्ही आम्हाला असं वागवू शकत नाही. आम्ही २५ वर्षांची सरकारी सेवा दिली आहे. तुम्ही असं बोलू शकत नाही असं म्हणाले.

वादामुळं बैठकीत शांतता

अनुराग यादव हे प्रिन्सिपल सेक्रेटरी रँकचे अधिकारी आहेत. ते उत्तर प्रदेश सरकारमध्ये कार्यरत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या वादावादीमुळं बैठकीत शांतता पसरली होती. त्यानंतर पुन्हा चर्चा मुद्द्यावर आली. त्यानंतर निवडणूक आयोगाने यादव यांना निरीक्षक पदावरून त्वरित हटवलं.

दरम्यान, निवडणूक आयोगातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यादव यांना बैठकीत बंडखोरी केल्याच्या कारणावरून नाही तर त्यांना व्यवहारिक दृष्टीकोणाचा अभाव या कराणामुळं हटवण्यात आलं आहे.

यादव यांच्या प्रामाणिकपणावर शंका

या बैठकीवेळी यादव यांना तुमच्या मतदार संघात किती मतदान केंद्रे आहेत असे साधे प्रश्न विचारण्यात आले होते. मात्र त्यांना योग्य माहिती देता आली नाही. त्यामुळं कुमार यांनी त्यांच्यावर टीका केली होती.

निवडणूक आयोग अधिकारी म्हणाला की, 'निरीक्षक हा निवडणूक आयोगाचे डोळे आणि कान असतात. इतके दिवस ग्राऊंडवर घालवल्यानंतर एखाद्या अधिकाऱ्याला मतदार संघात किती मतदान केंद्र या साध्या प्रश्नाचं उत्तर देता येत नसेल तर त्याच्या कामाबद्दलच्या प्रामाणिकपणावर प्रश्न उपस्थित होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT