पंतप्रधान नरेंद्र मोदी  file photo
राष्ट्रीय

West Bengal Result 2026 | पश्चिम बंगालमध्ये भाजपचा ऐतिहासिक विजय; पंतप्रधान मोदींकडून कार्यकर्त्यांच्या 'संघर्षाला' सलाम!

West Bengal Result 2026: कार्यकर्तेच भाजपची खरी ताकद

पुढारी वृत्तसेवा

West Bengal Result 2026

नवी दिल्‍ली : "पश्चिम बंगालमधील भाजपचा हा विक्रमी विजय अनेक पिढ्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांच्या कष्ट आणि संघर्षामुळेच शक्य झाला आहे. मी त्या सर्वांना सलाम करतो. अनेक वर्षांपासून त्यांनी मेहनत घेतली, सर्व प्रकारच्या संकटांवर मात केली आणि आपल्या विकासकामांचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवला. तेच आमच्या पक्षाची खरी ताकद आहेत," अशा शब्‍दांमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्‍चिम बंगाल निकालावर प्रतिकिया दिली आहे.

भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाने बाजी मारली

एक्‍स पोस्‍टमध्‍ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्‍हटलं आहे की, "२०२६ ची पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक कायम लक्षात ठेवली जाईल. जनशक्तीचा विजय झाला असून भाजपच्या सुशासनाच्या राजकारणाने बाजी मारली आहे. मी पश्चिम बंगालमधील प्रत्येक नागरिकासमोर नतमस्तक होतो. जनतेने भाजपला शानदार कौल दिला आहे आणि मी त्यांना खात्री देतो की, आमचा पक्ष पश्चिम बंगालमधील जनतेची स्वप्ने आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. आम्ही असे सरकार देऊ जे समाजातील सर्व घटकांना संधी आणि सन्मान सुनिश्चित करेल."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT