पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्यामधील सर्व वक्फ मंडळाच्या जमिनींचे सर्वेक्षण होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मागील काही दिवसांपासून वक्फ मंडळाचा मुद्दा चर्चेमध्ये आहे. त्यामुळे राज्यातील सर्व वक्त मंडळाच्या जागांचे जिओ मॅपिंग करण्यात येणार आहे, असा महत्वपूर्ण निर्णय अल्पसंख्यांक विभागाने दिलेला आहे. त्याचबरोबर जिओ मॅपिंगचा वापर करुन हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे वृत्त 'पुढारी न्यूज'ने दिले आहे. या महत्वपूर्ण निर्णयामुळे अतिक्रमण होण्यावर टाच येणार आहे. तर तज्ञ संस्थांच्या माध्यमाने लवकरच या सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात येणार आहे.
राज्यामध्ये वक्फ मंडळाच्या एकूण 23 हजार 566 मालमत्ता आहेत. त्या वक्फ जमिनींचे क्षेत्रफळ 37 हजार 330 हेक्टर इतकं आहे. अल्पसंख्यांक विभागानुसार मालमत्तांची संख्या अंदाजे 27 हजार हेक्टर आहे. अल्पसंख्यांक विभागानुसार क्षेत्र 40 हजार 468 हेक्टर असल्याची माहिती आहे.