राष्ट्रीय

Viral video : 'रेल्वेत असा TC ......" : व्हायरल व्हिडिओने सोशल मीडियावर क्रश, हास्यकल्लोळ आणि टोमण्यांचा धुमाकूळ!

शताब्दी एक्स्प्रेसमध्ये 'हँडसम' टीसीवर फिदा झालेल्या महिलेने इन्स्टा रील बनवत व्यक्त केली भावना

पुढारी वृत्तसेवा

Railway Ticket Collector Viral video :

नवी दिल्‍ली : रेल्वे प्रवास म्हटलं की, तिकीट तपासनीस (TC) हा अविभाज्य घटक असतो. ज्या प्रवाशांचे तिकीट अनिश्चित असते, ते टी.सी.ला टाळणे नित्याची बाब! पण, कन्फर्म तिकीट असणाऱ्यांसाठी हाच टी.सी. अनेकदा खरा मदतनीस ठरतो. याची चर्चा करण्याचे खास कारण म्हणजे, सध्या सोशल मीडियावर एका रेल्वे टी.सी.चा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. 'शताब्दी एक्स्प्रेस'मध्ये प्रवास करणाऱ्या एका महिला 'हँडसम' टी.सी.वर फीदा झाली. "जर माझ्याकडे त्याच्यासारखा तिकीट तपासणारा असता, तर मी दररोज ट्रेनने प्रवास केला असता!" अशी टिप्पणी करत तिने व्हिडिओ पोस्‍ट केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मॉडेल की टीसी.. 'हँडसम' व्‍यक्‍तिमत्त्‍वावर महिला फिदा

व्हायरल झालेल्या रीलमध्ये, देखणे व्यक्तिमत्त्व असणारा टीसी एसी कोचमध्ये अत्यंत शांतपणे प्रवाशांची तिकीट तपासणी करताना दिसत आहे. याच वेळी एका महिला प्रवाशाने त्याला कॅमेऱ्यात कैद केले. या रीलच्या बॅकग्राऊंडला अरिजित सिंगचे गाणे वापरले आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे – "हाय! जर असा टीसी असेल तर मी रोज ट्रेनने प्रवास करेन."

काही सेकंदांच्या रीलचा सोशल मीडियावर धुमाकूळ

काही सेकंदाच्या या रीलने सोशल मीडियावर सोशल मीडियावर क्रश, हास्यकल्लोळ आणि टोमण्यांचा धुमाकूळ घातला आहे. एका युजरने खिल्ली उडवत म्हटले आहे की, 'तुम्ही तिकीट खिडकीतून फेकून द्या, मग हा तुम्हाला पकडून घेऊन जाईल." तर दुसऱ्याने महिलेची थट्टा करत म्हटले आहे की, "सरकारी नोकरी आहे, याला खूप सुंदर बायको मिळेल; तुम्ही स्वप्न पाहू नका." "तुम्हाला दुसऱ्यांचे भाऊ, मुलगे, बॉयफ्रेंड यांना निरखून पाहताना लाज वाटत नाही?", असा सवाल एकाने केल्याने हास्यकल्लोळाला उधाण आले.

कमेंट्सचा पाऊस

काही सेकंदाच्या या रील पाहून काही युजर्सनी कमेंट केली की, "माझ्याकडे तिकीटच नाहीये, प्लीज मला पकडून घ्या!" तर एका युजरने दावा केला की हा टीसी विवाहित आहे. तर अनेकांनी ही ट्रेन शताब्दी आहे की वंदे भारत, याबाबतही उत्सुकता व्यक्त केली आहे. या रीलवर कमेंटचा पाऊस पडत असून या व्हिडिओवरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले की, सोशल मीडियावरील अचानक व्हायरल झालेला चेहरा हा रातोरात स्टार बनतो. दरम्यान, हा व्हिडिओ नेमका कोणत्या ट्रेनचा आहे, याची अधिकृत माहिती नसली तरी, पोस्ट करणाऱ्या युजरने हॅशटॅगमध्ये 'शताब्दी एक्स्प्रेस'चा उल्लेख केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT