Thief woman slapped 17 times in jewellery shop
अहमदाबाद: डोळ्यात चटणी फेकून दुकानात चोरी करणाच्या एका महिलास ज्वेलरी शॉप मालकानाने जन्माची अद्दल घडवली. सावध दुकानदाराने तिचा कट उधळून लावला आणि काही सेकंदातच प्रत्युत्तर दिले.ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, डोळ्यात चटणी फेकण्याचा प्रयत्न केल्यानंतर संतप्त ज्वेलर्स शॉपी मालकाने महिलेला २० सेकंदांत तब्बल १७ थप्पड लगावल्या. या थरारक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
अहमदाबादच्या रानीप परिसरात एक महिला ज्वेलर्स शॉपीमध्ये दागिने घेण्याच्या बहाण्याने आली. तिने स्क्रॉफने आपला चेहरा अर्धवट झाकला होता. यावेळी दुकानात मालकाशिवाय अन्य कोणी नव्हते. महिलेने प्रथम ज्वेलर्स शॉपी मालकास बोलविण्यात गुंतवले. यानंतर अचनाक त्याच्यावर मिरची पावडर फेकण्याचा प्रयत्न केला.
सीसीटीव्ही फुटेजमधील व्हिडिओमध्ये दिसते की, महिलेने डोळ्यात मिरची पूड फेकण्याचा प्रयत्न केला. सावध असणार्या ज्वेलरी शॉपीच्या मालकाने हा हल्ला चुकवला. यानंतर त्याने महिलेस पडकत २० सेकंदात १७ वेळा थप्पड लगावल्या. काउंटरवरून उडी मारत तिला दुकानातून बाहेर ढकलले.केवळ काही सेकंदांचा हा संपूर्ण भाग सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. यानंतर सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. दरम्यान, सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे रानीप पोलिसांनी महिलेचा शोध सुरू केला. पोलिस येण्यापूर्वीच ही महिला घटनास्थळावरून पसार झाली.
या प्रकरणी स्थानिक पोलिसांनी स्पष्ट केले की, “आम्ही सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या पुरूषाला तक्रार दाखल करण्यास पटवून देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याने नकार दिला. आम्ही संबंधित महिलेचा शोध घेत आहोत. तिने अशा प्रकारे अन्य ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला का, याचही तपास सुरु आहे."