Viral Video Single Father Auto Driver pudhari photo
राष्ट्रीय

Viral Video Single Father Auto Driver: पुरूष होणं सोपं नाही... रिक्षाच्या मागच्या भागात मुलीला झोपवून भरतोय पोटाची खळगी

Anirudha Sankpal

Viral Video Single Father Auto Driver: सोशल मीडिया कायमच मनोरंजन आणि मज्जा करण्याचं ठिकाण नसतं. कधी कधी सोशल मीडियावरील एक व्हिडिओ तुम्हाला खडतर जीवनाचा एक चेहरा देखील दाखवते. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका रिक्षा चालकाची नियतीनं मोठी परीक्षा पाहिली. मात्र सिंगल फादर असलेल्या या रिक्षा चालकानं आपलं कुटुंब सावरण्यासाठी आणि मुलीच्या भविष्यासाठी अनेक त्याग केले.

आईचा मायेचा पदर हरपला

स्वतःवर आणि कुटुंबावर मोठा आघात झाला असताना या रिक्षा चालकाने प्रवाशांची सेवा करणं सोडलं नाही. त्यानं आईचा मायेचा पदर हरपलेल्या आपल्या मुलीला रिक्षाच्या मागच्या सीटच्या पाठीमागे असलेल्या छोट्या जागेत झोपवून प्रवाशांची सेवा करणं सुरू ठेवलं.

दरम्यान, सोशल मीडियावर एका व्यक्तीनं या रिक्षा चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडिओत हा प्रवासी रिक्षामध्ये ही मुलगी का झोपली आहे असं रिक्षा चालकाला विचारतो. हे मुल कोणाचं आहे असं तो विचारतो त्यावेळी सर्वांचेच डोळे पानवतील असं उत्तर रिक्षा चालक देतो.

..तर पोट भरता येणार नाही

रिक्षा चालक म्हणतो, 'ही माझी मुलगी आहे. माझी पत्नी या मुलीच्या आईचे नुकतेच निधन झाले आहे. मी माझ्या मुलीला घरी सोडून रिक्षा चालवण्यासाठी येऊ शकत नाही. जर मी तिची काळजी घेण्यासाठी घरीच थांबलो तर आम्हाला आमचं पोट भरता येणार नाही. आता मी सिंगल फादर आहे. त्यामुळंच मी माझ्या मुलीला माझ्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच रिक्षामध्ये घेऊन येत आहे.'

सिंगल फादरची कहानी

या रिक्षा चालकाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सॅफ्रॉन चार्जेस या अकाऊंटवरून हे ट्विट करण्यात आले आहे. या पोस्टला, 'या रिक्षा चालकाला भेटा... हे सिंगल पेरेंट आहेत. जेव्हा यांच्या पत्नीचं निधन झालं तेव्हापासून ते आपल्या मुलीला आपल्यासोबत रिक्षामधून घेऊन व्यवसाय करतात. ते आपल्या छोट्या कुटुंबातं पोट भरतात आि मुलीचे संगोपन देखील करतात. रिक्षा चालकाची ही खडतर कहानी ऐकून या प्रवाशानं त्या मुलीला ज्यूस दिला आणि त्यांना शुभेच्छा देखील दिल्या. त्यानं पोस्टच्या शेवटी पुरूष होणं सोपं नाही असं देखील लिहिलं आहे.

या व्हिडिओवर हजारो कमेंट आले आहेत. अनेकांनी या रिक्षा चालकाला हिरो म्हटलं आहे तर अनेकांनी मुलीच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT