Viral Video | ब्राझीलमधील हा शेतकरी आपल्या गायींची घेतो शाळेप्रमाणे हजेरी, नावाने हाक मारल्यावर गायीपण देतात प्रतिसाद!

व्हायरल व्हिडीओतून गायींच्या हुशारीची येते प्रचिती
Viral Video
ब्राझिलमधील हा शेतकरी आपल्या गायींची घेतो शाळेप्रमाणे हजेरी
Published on
Updated on

Brazil : ब्राझीलमधील एक शेतकरी व त्‍याच्या गायींचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये हा शेतकरी चरणाऱ्या गायींजवळ जातो व खूर्ची टाकून बसतो. त्‍यानंतर तो गाायींची नावे पुकारतो गायीही त्‍याला प्रतिसाद देतात. एखाद्या शाळेत शिक्षकांनी मुलांची हजेरी घ्यावी, अगदी त्याचप्रमाणे हा शेतकरी आपल्या गायींची हजेरी घेत असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर या शेतकऱ्याचा व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. हा शेतकरी आपल्या चरणाऱ्या गायींची चक्क नावाने हजेरी घेतो आणि प्रत्येक गाय आपले नाव पुकारल्यानंतर हुशार विद्यार्थ्याप्रमाणे 'हंबरून' त्याला प्रतिसाद देते.

ब्राझिलमधील ही घटना सध्या खूप व्हायरल होत आहे

ब्राझीलमधील एका ग्रामीण भागात राहणाऱ्या या शेतकऱ्याचे आपल्या पशुधनावर जीवापाड प्रेम आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसते की, हा शेतकरी एका जागी खूर्ची टाकून बसतो एकेका गायीचे नाव पुकारतो. जसे तो नाव घेतो, तशी ती विशिष्ट गाय कळपातून प्रतिसाद देते किंवा त्याच्या दिशेने कान टवकारून बघते.

शिक्षकाप्रमाणे सूचना देतो

हा शेतकरी पहिल्यांदा गायी चरत असलेल्या कुरणात येतो. येता येता तो गायींना सूचना देत असतो त्‍यावेळी गायीही त्‍याच्याकडे टवकारुन पाहतात. त्‍यानंतर तो रजिस्टर घेऊन खूर्चीवर बसतो व एका एका गायीचे नाव घेण्यास सुरवात करतो. गायीही आपल्या नावाप्रमाणे हंबरुन प्रतिसाद देतात. ब्रुनो, ग्रॅब्रियल, कियागो, मोकाय, अशा नावे हाका मारतो. त्‍यानंतर तो हात वर करुन हजर असल्याची खूण करतो. हा व्हिडीओ पाहताना गायींची स्मरणशक्ती आणि त्यांचे भावनिक बंध किती घट्ट असू शकतात, हे समोर आले आहे. व्हिडीओवर कंमेटचा पाऊस पडला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news