cancelled wedding viral post : लग्न ठरलं.... तो नवजीवनाची गुलाबी स्वप्नही पाहू लागला... स्वप्न वास्तवात उतरवण्यासाठी हनिमूनचेही डेसिटनेशनचं प्लॅनिंगही केले. विमानाची तिकिटही वाढली; पण हे सारं नियतीला मान्य नसावे. नियोजित वधूच्या एका मागणीने लग्नच मोडलं. हृदयद्रावक प्रसंगाला सामोरे जाणार्या तरुणाने आपली कहाणी आणि तिकिटांची ऑफर एका 'व्हायरल पोस्ट'द्वारे Reddit या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केली आहे.
तरुणाने पोस्टमध्ये सांगितले की, त्यांचे नाते एका कॉकटेल पार्टीत तुटले. कारण नियोजित वधुने अनपेक्षितपणे 'ओपन मॅरेज'ची मागणी केली. या मागणीने तरुणाला धक्का बसला. कुटुंबाला ही मागणी कशी सांगावी, या विवंचनेत तो होता. अखेर लग्न मोडलं. मात्र त्याने लग्न ठरल्यानंतर हनिमूनची तिकिटे बुक केली होती, ती वाया जाऊ नये म्हणून त्याने खास ऑफरच जाहीर केली.
लग्न मोडलेल्या तरुणाने तिकीट मिळवण्यासाठी त्याने एकच ऑफर ठेवली आहे: तिकीट घेणाऱ्याचे नाव 'आशिष गुप्ता' असायला हवे! विशेष म्हणजे आयुष्यातील अत्यंत वेदनादायी प्रसंगालही त्याने आपली विनोदी बुद्धी शाबूत ठेवली. "जर कोणाची गर्लफ्रेंड किंवा जवळच्या मित्राचे नाव 'राशी' असेल, तर ते या प्रवासात सामील होऊ शकतात," असे त्याने पोस्टमध्ये म्हटले आहे.
संबंधित तरुणाला सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात सहानुभूती मिळत आहे. एकाने युजरने सल्ला दिलाय की, "तुम्ही स्वतःला बरे करण्यासाठी एकटेच फिरायला जावे. तर एका युजरने म्हटलं आहे की, "तुम्ही एका अणुबॉम्बपासून वाचलात. स्वतःला एकांतवासाची भेट द्या."