सैंथिया शहरात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. X Account
राष्ट्रीय

पश्चिम बंगालमधील बीरभूममध्ये हिंसाचारानंतर तणाव; अनेक भागातील इंटरनेट सेवा बंद

Birbhum Violence | परिस्थिती तणावपूर्ण, सुरक्षा दल तैनात

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील (Birbhum Violence) सैंथिया शहरात होळीच्या दिवशी दगडफेकीच्या घटनेनंतर हिंसाचार उफाळून आला. त्यामुळे तेथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने १४ मार्च ते १७ मार्च पर्यंत शहरातील अनेक भागात इंटरनेट सेवा बंद ठेवल्या आहेत.

इंटरनेट आणि व्हॉइस-ओव्हर-इंटरनेट टेलिफोन सेवा बंद

अफवा आणि बेकायदेशीर कारवाया रोखण्यासाठी सैंथिया शहरातील किमान पाच ग्रामपंचायतींमध्ये इंटरनेट आणि व्हॉइस-ओव्हर-इंटरनेट टेलिफोन सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे बेकायदेशीर कारवायांच्या अफवा रोखण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. (Birbhum Violence)

भाजपने ममता सरकारला घेरले

दरम्यान, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर सतत हल्ले होत असल्याचा आरोप भाजप नेते अमित मालवीय यांनी केला आहे. नंदीग्राम ब्लॉक २ मधील अहमदाबाद परिसरातील कमालपूर येथील स्थानिक रहिवासी गेल्या मंगळवारपासून नमाज अदा करत होते. जेव्हा पूजा आणि राम नारायण कीर्तन अखंडपणे सुरू होते. तेव्हा काही लोकांना श्री रामाच्या नावाचा जप सहन झाला नाही. त्यामुळे त्यांनी तेथे तोडफोड करून मूर्तींची विटंबना केली.

बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादमध्येही हिंसाचाराच्या घटना घडल्या.

बरुईपूर, जाधवपूर आणि मुर्शिदाबादसह राज्यभर अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत. याशिवाय पोलिसांनी बंगालच्या काही भागात होळी (डोल पौर्णिमा) साजरे करण्यावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला. या कठीण काळात भाजप बंगाल त्यांच्यासोबत खंबीरपणे उभा आहे. आम्ही ममता बॅनर्जींना पश्चिम बंगालला दुसरे बांगलादेश बनवू देणार नाही, असा इशारा मालवीय यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT