Vinod Tawde BJP UP In-Charge Pudhari
राष्ट्रीय

Vinod Tawde: महाराष्ट्रातून थेट यूपीच्या रणांगणात! विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी; निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव

Vinod Tawde BJP UP In-Charge: भाजपने पक्ष संघटनेत मोठे बदल करत विनोद तावडे यांची उत्तर प्रदेशच्या प्रभारीपदी नियुक्ती केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Vinod Tawde BJP UP In-Charge: भाजपने आपल्या पक्ष संघटनेत मोठे फेरबदल केले असून, अनेक महत्त्वाच्या राज्यांसाठी नवीन प्रभारी नेत्यांची नियुक्ती केली आहे. आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेऊन अनुभवी नेत्यांकडे विविध राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या बदलात भाजपचे राष्ट्रीय महासचिव आणि राज्यसभा खासदार विनोद तावडे यांच्याकडे उत्तर प्रदेशचे प्रभारीपद देण्यात आले आहे. त्यांच्या मदतीसाठी जगदीश ईश्वरभाई पटेल यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर प्रदेश हे भाजपसाठी राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे राज्य असल्याने तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी आली आहे.

Vinod Tawde BJP UP In-Charge

तसेच सतीश पुनिया यांना पंजाबचे प्रभारी करण्यात आले आहे. पंजाबमध्ये पक्षाची संघटना अधिक मजबूत करणे आणि आगामी निवडणुकांसाठी पक्षाची ताकद वाढवणे, हे त्यांच्यासमोरील प्रमुख आव्हान असेल.

दुसरीकडे, तरुण चुग यांच्याकडे गुजरातचे प्रभारीपद सोपवण्यात आले आहे. गुजरात हा भाजपचा मजबूत गड मानला जातो. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुजरातमधील पक्ष संघटनेची जबाबदारी चुग यांच्याकडे देण्यात आली आहे.

भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या राष्ट्रीय पातळीवरील संघटनेतही बदल करण्यात आले आहेत. पक्षाने नवीन आणि अनुभवी नेत्यांचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे.

नव्या टीममध्ये स्मृती इराणी यांची राष्ट्रीय महासचिव, तर राम माधव आणि वसुंधरा राजे सिंधिया यांची राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पीयूष गोयल यांच्याकडे राष्ट्रीय कोषाध्यक्षपद सोपवण्यात आले आहे.

दरम्यान, बी. एल. संतोष हे संघटन महामंत्रीपदी कायम राहणार आहेत. पक्षाच्या मीडिया विभागाची जबाबदारी अनिल बलुनी यांच्याकडेच असेल, तर सोशल मीडिया विभागाची जबाबदारी छत्तीसगडचे दीपक म्हास्के यांच्याकडे देण्यात आली आहे.

एकूणच, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने संघटनेत मोठे बदल केले असून, महत्त्वाच्या राज्यांची जबाबदारी अनुभवी नेत्यांकडे सोपवून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT