EARAZA Conference 2026 Pudhari
राष्ट्रीय

EARAZA Conference 2026: वनतारामध्ये जागतिक वन्यजीव परिषदेसाठी ३० देश एकत्र

वन्यजीव संवर्धनासाठी जागतिक भागीदारी मजबूत करण्यावर भर; सदस्य संस्थांना ANTZ प्लॅटफॉर्म एक वर्ष मोफत

पुढारी वृत्तसेवा

जामनगर: युरेशियन रिजनल असोसिएशन ऑफ झूज अँड अक्वेरियम्स (EARAZA) ची वार्षिक परिषद २०२६ यंदा वनतारा येथे आयोजित करण्यात आली आहे. २६ ते २९ ऑक्टोबर दरम्यान होत असलेल्या या परिषदेसाठी ३० देशांमधील ९८ संस्था आणि भारतातील २९ प्राणी संग्रहालय संस्थांमधील नेते, पशुवैद्य, शास्त्रज्ञ आणि संवर्धनतज्ज्ञ जामनगरमध्ये एकत्र आले आहेत.

यंदाची थीम आहे - "Strengthening Global Partnerships for Wildlife Conservation" अर्थात "वन्यजीव संवर्धनासाठी जागतिक भागीदारी मजबूत करणे".

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी तीन वेळा ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार आणि पर्यावरणवादी रिकी केज यांच्या विशेष सादरीकरणाने सुरुवात झाली.

त्यानंतर पारंपारिक दीपप्रज्वलन करण्यात आले, यावेळी EARAZA च्या अध्यक्ष सुश्री स्वेतलाना अकुलोवा, भारतीय विज्ञान संस्था (IISc), आशियाई हत्ती तज्ज्ञ प्रा. रमण सुकुमार, केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाचे सदस्य सचिवडॉ. व्ही. क्लेमेंट बेन उपस्थित होते.

वनताराची मोठी घोषणा

यजमान म्हणून वनताराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवान कराणी यांनी महत्त्वाची घोषणा केली - ANTZ सॉफ्टवेअर प्लॅटफॉर्म EARAZA च्या सर्व सदस्यांसाठी एक वर्षासाठी मोफत उपलब्ध करून दिला जाणार आहे. ANTZ हे प्राणी संग्रहालय संस्थांच्या व्यवस्थापनासाठीचे सुरक्षित क्लाउड प्लॅटफॉर्म असून, त्यातील ओपन डेटा एक्सचेंजमुळे सदस्य संस्थांना माहितीची देवाणघेवाण करता येईल, असे ते म्हणाले.

अनंत अंबानी यांनी स्थापन केलेल्या जामनगरमधील वन्यजीव बचाव आणि पुनर्वसन केंद्र वनतारा येथे होत असलेली ही परिषद जागतिक प्राणी कल्याण मानके उंचावण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य दृढ करण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.

वनतारा म्हणजे जंगलाचा तारा. पण एका ताऱ्याने संपूर्ण आकाश उजळत नाही. त्यासाठी नक्षत्रमालाच लागते. आम्ही इथे फक्त आम्ही काय बांधले आहे हे सांगायला आलो नाही, तर तुमच्याकडून शिकण्यासाठी, सहकार्य करण्यासाठी आलो आहोत."
- विवान कराणी, CEO, वनतारा
आजच्या काळात संवर्धन हे राष्ट्रीय सीमांवर थांबू शकत नाही. जेव्हा संस्था डेटा, कौशल्य आणि जबाबदारी वाटून घेतात, तेव्हा प्रत्येक कार्यक्रम अधिक मजबूत होतो."
- स्वेतलाना अकुलोवा, अध्यक्ष, EARAZA

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT