प्रातिनिधिक फोटो. 
राष्ट्रीय

Valentine's Day tragedy | अरेरे! १५ वर्षांच्या नात्याचा करुण अंत; व्हॅलेंटाईन डेलाच कारमध्ये सापडले प्रियकर-प्रेयसीचे मृतदेह!

तरुणाने तरुणीला पाठवलेल्या 'त्‍या' शेवटच्या मेसेजमधून उलगडले घटनेमागील रहस्‍य

पुढारी वृत्तसेवा

Valentine's Day tragedy

नोएडा : व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी नोएडा येथे एका कारमध्ये प्रेमी युगुलाचे मृतदेह आढळल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. प्राथमिक तपासानुसार, मृत तरुण-तरुणी गेल्या १५ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तरुणीचे लग्न दुसऱ्या कोणाशी तरी ठरल्यामुळे झालेल्या वादातून हा टोकाचा निर्णय घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

सुमित आणि रेखा अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात

दिल्लीनजीक नोएडामध्ये कारमध्ये गोळ्या लागलेल्या अवस्थेत तरुण-तरुणीचे मृतदेह सापडले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणीची ओळख रेखा (रा. सेक्टर-५८, नोएडा) आणि तरुणाची ओळख सुमित (रा. त्रिलोकपुरी, दिल्ली) अशी झाली आहे. हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांच्या संपर्कात होते.

शेवटच्या मेसेजमधून उलगडले रहस्य

दोघेही आदल्या दिवसापासून आपापल्या घरातून बेपत्ता होते. त्यांच्या कुटुंबीयांनी बेपत्ता झाल्याची तक्रारही नोंदवली होती. तपासणीदरम्यान पोलिसांना तरुणाने तरुणीला पाठवलेला एक मेसेज सापडला आहे. त्या मेसेजमध्ये सुमितने त्यांच्या १५ वर्षांच्या नात्याचा उल्लेख केला होता. रेखाने त्याच्याशी लग्न करण्याचे वचन दिले होते, परंतु आता ती दुसऱ्या कोणाशी तरी लग्न करणार होती.

तरुणाने तरुणीची हत्या करून जीवन संपवले?

घटनास्थळी कारमध्ये तरुणाच्या हातात पिस्तूल सापडले आहे. त्यामुळे सुमितने आधी रेखावर गोळी झाडली. त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले असावे, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. "या प्रकरणी आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून, डिजिटल पुरावे आणि पोस्टमार्टम रिपोर्टनंतरच या प्रकरणाचा अधिकृत खुलासा होईल," असे नोएडा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT