Uttarakhand tunnel accident File Photo
राष्ट्रीय

Uttarakhand tunnel accident: उत्तराखंडमध्ये मोठी दुर्घटना! चमोलीत बांधकाम सुरू असताना बोगद्यात दरड कोसळली; ७ कामगारांचा मृत्यू

उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मायापूर येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे आत काम करत असलेल्या सात कामगारांचा मृत्यू झाला.

पुढारी वृत्तसेवा

Uttarakhand tunnel accident

देहराडून: उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील मायापूर येथे बांधकाम सुरू असलेल्या बोगद्यात दरड कोसळल्यामुळे आत काम करत असलेल्या सात कामगारांचा मृत्यू झाला आणि दोन जण बेपत्ता झाले. गुरुवारी संध्याकाळी ही घटना घडली. बोगद्यात अडकलेल्या एकूण २२ कामगारांपैकी १४ जणांची सुटका करण्यात आली असून बेपत्ता असलेल्या दोन कामगारांसाठी शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

गुरूवारी संध्याकाळी ७:०५ च्या सुमारास २ किमी लांबीच्या या बोगद्यात 'हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी' द्वारे बांधकाम केले जात होते. यावेळी बोगद्यात अचानक दरड कोसळल्यानंतर पाणी आणि चिखल वेगाने शिरला. यामुळे कामगार आत अडकले.

यावेळी २२ कामगार आत काम करत होते. त्यातील १४ जणांची सुटका करण्यात आली. बोगद्याच्या आत सुमारे १.४ किमी अंतरावर ही पोकळी निर्माण झाली होती, ज्याद्वारे पाणी आणि मलबा आत शिरला. "पाणी बाहेर काढण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत," असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यांनी सांगितले की, बोगद्याच्या मार्गाच्या वरच्या बाजूला दरड कोसळल्यामुळे ही पोकळी निर्माण झाली असावी.

घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांनी शोध आणि बचाव कार्य सुरू केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, लष्कर, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची पथकेही तैनात करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT