uttar pradesh gas leak in shahjahanpur government medical college
उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयाच्या ट्रॉमा सेंटरच्या ओटीमध्ये रसायन सांडल्याने आणि गॅस गळती झाल्याने चेंगराचेंगरी झाली. रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक सुरक्षित स्थळी पळू लागले. चेंगराचेंगरीत एका गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, परंतु डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी कोणाच्याही मृत्यूचे वृत्त नाकारले आहे. रविवारी (दि. 25) ही दुर्घटना घडली.
या घटनेनंतर रुग्णांना ताबडतोब वॉर्डाबाहेर हलवण्यात आले. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत होता. यानंतर लगेचच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. ऑपरेशन थिएटरमधून गॅसचा धूर येत असल्याचे सांगण्यात आले.
शाहजहांपूरचे डीएम धर्मेंद्र प्रताप सिंह यांनी घटनेची पुष्टी केली आणि गॅस गळती झाल्याचे सांगितले. ते म्हणाले सुदैवाने, आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेनंतर पोलिस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेची चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात फॉर्मेलिन रसायनापासून बनवलेल्या गॅसची गळती झाली होती. यामुळे मोठा गोंधळ उडाला. घटनेचे गांभिर्य ओळखून रुग्णालयातील कर्मचा-यांनी तत्काळ रुग्णांना वॉर्डाबाहेर काढले. सध्या अग्निशमन दलाच्या पथकाने विशेष स्प्रे फवारून गॅसचा प्रभाव कमी केला. वायूमुळे त्यांना डोळ्यांत जळजळ होत होती आणि श्वास घेण्यास त्रास होत होता, असे रुग्णांनी सांगितले.